नाशिक -८/६/२३
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सर्वच पक्षांकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाच्या देखील चर्चा सुरू आहेत. एकीकडे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडीची चिन्ह दिसत असताना दुसरीकडे अशीच स्थिती आता युतीमध्ये देखील होण्याची शक्यता आहे.
नाशिक लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू झाल्याचं पहायाला मिळत आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छूक असलेल्या भाजप पदाधिकाऱ्याकडून शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर जोरदार टीका करण्यात आली आहे.
सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमधून भाजप इच्छूकानं शिवसेनेच्या विद्यमान खासदारांवर जोरदार निशाणा साधला आहे.
या पोस्टमध्ये शिवसेनेच्या खासदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात आला आहे. त्यामुळे आता या टीकेनंतर नाशिक लोकसभेच्या जागेवरून निवडणुकीपूर्वीच शिवसेना आणि भाजपात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे हि वाचा :
https://mdtvnews.in/take-immediate-action-against-the-accused-in-the-sakshi-murder-case/
https://mdtvnews.in/the-director-kissed-kriti-sanon-in-the-temple-video-viral/
दरम्यान दुसरीकडे महाविकास आघाडीकडून देखील लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावर चर्चा सुरू झाली आहे.
मिळत असलेल्या माहितीप्रमाणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून सुरुवातीला समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. मात्र दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाकडून 18 जागांवर दावा करण्यात आला आहे.
हे हि वाचा :
https://mdtvnews.in/take-immediate-action-against-the-accused-in-the-sakshi-murder-case/
https://mdtvnews.in/the-director-kissed-kriti-sanon-in-the-temple-video-viral/
परंतु जागा वाटपावरून आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. योग्य वेळी जागा वाटप करण्यात येईल असा दावा मविआच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे.
तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज .. नाशिक