कंटेनर उलटला:दोन एसटी बसेससह कंटेनरचा तिहेरी अपघात..

0
163

नाशिक -२९/४/२०२३

12 प्रवाशी जखमी, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

नंदुरबारहून पालघरकडे जाणारी बस व नाशिकहून दोंडाईच्याकडे जाणाऱ्या बसचा समोरासमोर अपघात झाला आहे.

कंटेनरने बसला धडक दिल्याने तिहेरी अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे, अपघात एवढा भीषण आहे की नंदुरबार पालघर बस एका बाजूने कापली गेली आहे.

देवळा – सटाणा रस्त्यावर लोहोणेरजवळ असलेल्या सूरज पेट्रोल पंपाजवळ दोन बस व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात बसच्या वाहकासह 10 ते 12 प्रवाशी जखमी झालेत.

1
2
3

नेमकी घटना काय?

दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास सुमारास नंदूरबार – पालघर ही बस (एम.एच. 20 बी. एल. 4039) सटाणा येथून देवळाकडे जात असताना लोहोणेर गावाजवळच्या पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेले गतिरोधक पास करीत असताना समोरून येणार्‍या नाशिक दोंडाईचा बसला (एम. एच. 14 बी. टी. 2180) पाठीमागून कांद्याच्या गोणी घेऊन जाणार्‍या कंटेनरने (जी जे 25 यु 5141) जोरदार धडक दिल्याने नाशिक – दोंडाईचा बस नंदुरबार – पालघर बसवर जाऊन आदळली.

पालघर बसचा वाहक सुहास शिवराम आसगेसह दहा ते बारा प्रवाशी जखमी झालेत.

जखमींमध्ये पाच वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. या अपघातास कारणीभूत ठरलेला कांद्याच्या गोणी घेऊन जाणारा कंटेनर बाजूच्या शेतात एलटला आहे. अपघात भीषण असला तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

जखमींना तातडीने लोहोणेरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. तर दोंडाईचा बसचा वाहक सुहास शिवराम आसगे (36, रा. जैताने, निजामपूर) यास दोन्ही डोळ्याच्या मध्ये मार लागल्याने व रघुनाथ फकीरा वाघ (56, रा. तळवाडे ) यांच्या उजव्या बाजूच्या खांद्याला मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी देवळा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

जखमींना येथील युवकांनी तातडीने उपचारासाठी येथील आरोग्य केंद्रात हलविले.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

घटनास्थळी राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आगाराचे व्यवस्थापक राजेंद्र आहिरे, वाहतूक निरीक्षक बसते, सहाय्यक वाहतूक निरीक्षक हर्षल कोठावदे यांनी भेट देऊन प्रवाशांची विचारपूस केली. कंटेनर चालक व क्लिनरबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.

देवळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक समीर बारावकर यांनी पोलिस कर्मचार्‍यांसह तातडीने घटनास्थळी दाखल होऊन अपघातामुळे झालेली वाहतूक कोंडी मोकळी केली. याबाबत अपघाताचा गुन्हा दाखल झाला आहे.

तेजस पुराणिक ,जिल्हा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ,नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here