भाजपाला ‘ती’ चूक भोवणार; कसबा, चिंचवड पोटनिवडणुकीबाबत राऊतांची मोठी भविष्यवाणी..

0
230

नाशिक:१५/०२/२०२३

शॉर्ट हेडलाईन –
१. संजय राऊत हे आहेत सध्या नाशिक दौऱ्यावर
२. नाशिकमधून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर साधला निशाणा
३. नाशिकमध्ये शिवसेनेचा फडकेल भगवाच …

संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी नाशिकमधून पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. याचबरोबर त्यांनी कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे.

महाविकास आघाडी पूर्ण मार्काने पास होईल, मतदारांमध्ये कमालीचा संताप आहे. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत तो दिसून येईल. अंधेरीमध्ये शिवसेनेचा मोठा विजय झाला होता. भाजपाने मतदारांना कायम गृहीत धरले आहे. महाराष्ट्राच्या मतदारांना आता गृहीत धरता येणार नाही. याचा फटका भाजपला बसेल. सामान्य माणूस भाजपावर नाराज असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं..ऐकू या नेमकं कसबा निवडणुकीबाबत राऊत यांनी काय भविष्य वर्तवलंय..

नाशकात आगमन झाल्यावर माध्यमांशी संवाद साधतांना खासदार संजय राऊत …
  • फडणवीसांना टोला –
    दरम्यान यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील टोला लगावला आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात आपल्याला अटक करण्यात येणार होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. याला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना कोणीही अटक करणार नव्हतं. महाविकास आघाडी असलं घाणेरडे राजकारण करत नाही. आमचे मुख्यमंत्री संवेदनशील आणि सुसंस्कृत होते, असा टोला संजय राऊत यांनी फडणवीस यांना लगावला आहे.
  • नाशिक महापालिकेवर भगवा –
    दरम्यान त्यांनी यावेळी नाशिक महापालिका निवडणुकीबाबत देखील मोठी भविष्यवाणी केली आहे. पैशांचा एवढा वारेमाप वापर राज्यात कधी पाहिला नव्हता. काहीही झालं तरी नाशिकमध्ये शिवसेनेचा भगवाच फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीच्या प्रचाराला गती मिळाल्यानंतर आम्ही देखील प्रचारासाठी पुण्यात जाणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

नाशकात आगमन होताच शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी त्याच स्वागत केलं .यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर,दत्ता गायकवाड,वसंत गीते,प्रथमेश गीते ,विलास शिंदे ,त्र्यंबक कोंबडे,सुभाष गायधनी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी,एम डी टी व्ही न्युज,नाशिक

photo of tejas

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here