कोल्हापूर -७/६/२३
आक्षेपार्ह स्टेटस प्रकरणामुळे कालपासून (मंगळवार)कोल्हापुरात तणावाचे वातावरण आहे.
आज (बुधवारी) हिंदुत्ववादी संघटनांकडून आज कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनसमोर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते जमले आहे.
हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला आहे.
यावेळी आंदोलक आणि पोलिस यांच्यात शाब्दीक बाचाबाची अन् धक्काबुक्की झाली. त्यामुळे वातावरणात तणावपूर्ण आहे.आंदोलकांनी शिवाजी चौकात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.
काल (मंगळवारी) कोल्हापूर शहरातील सात तरुणांच्या मोबाईलमध्ये औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचा स्टेटस ठेवण्यात आल्याचे आढळले आहे.
यावरून कोल्हापूर शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कोल्हापूरच्या छत्रपती महाराज चौकात आज हिंदुत्ववाद्यांनी मोर्चा काढला आहे,
कोल्हापुरात बंदची देखील हाक देण्यात आली आहे.
आक्षेपार्ह स्टेटस ठेवणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनानं जिल्ह्यात जिल्हाबंदीचे आदेश काढले आहेत.
कोल्हापुरातही औरंगजेबाच्या फोटोवरून राडा झाला आहे..
शिवराज्याभिषेक दिनाच्या पार्श्वभूमीवर मुस्लीम तरुणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्यानं ही वादाची ठिणगी पेटली..
सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, येथील परिस्थितीत नियंत्रणाखाली आणा, असा आदेश सरकारने कोल्हापूर पोलिसांना दिला आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो , कोल्हापूर