रत्नागिरी :६/५/२३
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसीधील एका कंपनीत मोठी आग लागल्याची घटना घडली.
नायट्रिक एसिड गॅस गळती झाल्यानं ही आग लागल्याचं सांगण्यात येतंय.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
आगीमुळे कुणी जखमी झालेलं नाही, मात्र गॅसमुळे काही जणांना त्रास झाल्याची माहिती समोर आलीय.
आरोमा इंटरमिजिएट्स असं आग लागलेल्या कंपनीचे ननाव असून नायट्रिक ऍसिड गॅस लिकेज होऊन मोठी आग लागली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नायट्रिक गॅस गळतीनंतर लागलेल्या आगीमध्ये सुदैवाने कोणीही कामगार जखमी नाही.
मात्र गुणदे तलारीवाडी येथील पाच ते सहा ग्रामस्थांना गॅसची किरकोळ बाधा झाली असल्याचे समोर आले आहे. आगीमध्ये कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
आग इतकी मोठी होती की दोन किलोमीटर लांबून या आगीच्या धुराचे लोट दिसत होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.
नजीकच्या लोक वस्ती मधील लोक देखील मोठ्या प्रमाणावर घाबरले होते एमआयडीसीच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली असून गॅस लिकेज मुळे झालेल्या या दुर्घटनेमुळे एमआयडीसी परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
ठाण्यात भीषण आग
ठाण्यातील मानपाडा परिसरातील एक दुकानाला भीषण आग लागली आहे.
भर सकाळच्या सत्रात या परीसरात गर्दी असते त्यामूळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ठाणे पलिकचे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि ठाणे अग्निशमन दलाच्या वतीने आग विजवण्यात येत आहे.
आग लागलेल्या दुकानाच्या बाजूलाच एक रुग्णालय असून रुग्णालयातील रुग्णांना बाजूच्या बोर्ड मध्ये शिफ्ट करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो रत्नागिरी