महाविकास आघाडीकडून करण्यात आलं रास्ता रोको..

0
213

भडगाव:२१/२ /२३

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे जळगाव ते चाळीसगाव असा राष्ट्रीय महामार्ग असून त्याचे रखडलेले काम पूर्ण व्हावे यासाठी महाविकास आघाडीने आंदोलन केलं.

रखडलेले काम त्वरित व्हावे यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचं लक्ष वेधलं.

राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ व ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांच्यासह सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली कजगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं होतं.

शासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा महाविकास आघाडीतील पक्षांकडून देण्यात आला..

यावेळी मोठ्या संख्येने असंख्य कार्यकर्ते ,परिसरातील नागरिक, आणि शेतकरी बांधव उपस्थित होते..

सतीश पाटील
भडगाव प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here