धुळ्यात गुंगीचे औषध विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात

0
215

२८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त ; एकास अटक

नंदुरबार : धुळे शहरातील चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन हद्दीत गुंगीकारक औषध विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली आहे. संशयितांकडून सुमारे २८ हजार ३०० रुपये किमतीच्या औषधाच्या बाटल्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत धुळे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्याकडे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचा अतिरिक पदभार आहे. पोलीस निरीक्षक पाटील यांना दिनांक ३ जून रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चाळीसगाव रोड पोलीस ठाणे हद्दीतील शब्बीर नगर या सुमारे दोन हजार लोकवस्तीच्या ठिकाणी एक इसम गुंगीकारक औषध विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. पोनी. प्रमोद पाटील यांनी पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, संदीप ठाकरे यांना याबाबत माहिती देऊन त्वरित कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

1aa065b8 086f 4340 92fc 0f028d57c5be

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पोसई. विनोद पवार व पोसई संदीप ठाकरे यांनी चाळीसगाव पोस्टचे अमलदारांसोबत शहरातील शब्बीर नगर परिसरात जाऊन छापा टाकला असता या ठिकाणी एक इसम सादर औषध विक्री करीत असताना मिळून आला. त्याला त्याब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याचे नाव अकबर अली कैसर अली शेख ( वय ३४, रा. शब्बीर नगर धुळे असे सांगितले. पोलिसांनी संशयितांकडून २८ हजार ३०० रुपये किमतीच्या १०० मिली वजनाच्या व प्रत्येकी १४० रुपये किंमत असलेल्या १९५ सीलबंद बाटल्या जप्त केल्या या बाटल्यावर codeine phosphate chloropheniramine maleate and sodium cirtate cough linctus असे लिहलेले आढळून आले आहे. संशयितांची झडती घेतली असता त्याच्याकडे एक हजाराची रोकड मिळाली. हेको.पंकज शिंदे यांच्या फिर्यादीवरून अकबर अली कैसर अली शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

7f4c0680 0745 4bcb a6f8 93440c7056ad

सदर कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक विनोद पवार, संदीप ठाकरे, पोकॉ.पंकज चव्हाण, पोकॉ.रवींद्र ठाकूर, पोकॉ.संदीप पाटील, पोकॉ.चेतन झोळेकर, पोकॉ..स्वप्नील सोनावणे, पोकॉ. पंकज शिंदे, पोकॉ.संदीप वाघ, इमरान शेख, विशाल गायकवाड, देवेंद्र तायडे, शरद जाधव, सोमनाथ चौरे वाहन चालक कुलदीप महाजन यांच्या पथकाने केली.

एमडीटीव्ही न्युज ब्युरो, धुळे – नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here