MANIPUR INCIDENT FALLOUT:महाराष्ट्रात पडसाद, उद्या आदिवासी संघटनांकडून नंदुरबार जिल्हा बंदची हाक..

0
484

शहादा /नंदुरबार -२५/७/२३

गेल्या दोन महिन्यांपासून मणिपूरमध्ये मतंई आणि कुकी या समुदायांमध्ये हिंसाचार सुरू आहे.. 4 मे रोजी 700 ते 800 लोकांच्या जमावाने तीन कुकी महिलांना विवस्त्र करत त्यांची धिंड काढली होती. त्यानंतर आरोपींनी या महिलांवर बलात्कार केल्याचं समोर आलं होतं. घटनेच्या 78 दिवसानंतर त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.. यामुळे संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली होती. अनेकांनी संताप व्यक्त करत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर मधील घटनेवर भाष्य केलं. आरोपींवर कठोर कारवाई केली जाणार असून अशा घटनांमुळे देशाची मान खाली जात असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील चार आरोपींना नुकतीच अटक करण्यात आल्याची माहिती समोर येते..

1
2
3
4
5

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पण या प्रकरणानंतर संपूर्ण देशभरात आदिवासी संघटनांमधून संतापाची लाट उसळत विविध ठिकाणी मूक मोर्चा काढण्यात आला. याचे पडसाद म्हणून उद्या 26 जुलै रोजी विविध आदिवासी संघटनांकडून नंदुरबार जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. नुकतीच त्या संदर्भात शहादा शहरात सर्व आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे संयुक्तरित्या बैठक पार पडली.. विविध संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यांशी आमचे शहादा प्रतिनिधी संजय मोहिते सह जगन ठाकरे यांनी सविस्तर संवाद साधला. उद्या नेमकं नियोजन कसं असेल काय तयारी झाली आहे याचा आढावा या बैठकीतून थेट संजय मोहिते यांनी घेतला.. विविध पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपल्या प्रतिक्रिया एमडीटीव्हीशी नोंदवल्या.. शहादा पोलीस उपविभागीय अधिकारी यांना या संदर्भात देखील निवेदन देण्यात आलं. शहादा शहरातील व्यापारी संघटनांसह सोनार समाज संघटनेने या बंदला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. उद्या नंदुरबार जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर विविध संघटनांशी आदिवासी संघटना चर्चा करत असून उद्याचा नंदुरबार जिल्हा बंद कडकडीत पाळला जाईल यासाठी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते कामाला लागले आहेत. यात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत बंद पाळून आदिवासी संघटनेच्या मागणीला समर्थन करण्यासाठी आणि मणिपूर घटनेचा निषेध करण्यासाठी सर्व आदिवासी समुदायाने कंबर कसली आहे. त्यामुळे उद्याच्या बंद स्थितीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये तसेच कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी शांततेने बंद पाळावा असा आवाहन आदिवासी संघटनांनी केले आहे..
संजय मोहितेंसह जगन ठाकरे, एम डी टीव्ही न्यूज ,शहादा / नंदुरबार..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here