मुंबई /नंदुरबार /नाशिक -२८/७/२३
मणिपूर घटनेचे पडसाद संपूर्ण देशभर उमटत असतानाच या घटनेमुळे आदिवासी समाजाच्या देशभरातील बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. आदिवासींवर होणारे सातत्याने अत्याचार ही देशातल्या आदिवासींसाठी धोक्याची घंटा आहे का. भारत देशाचा आदिवासी समाज हा मूळ स्त्रोत आहे त्यावर आघात करण्याचं काम अज्ञात समाजकंटकांकडून मणिपूरमध्ये घडत आहे. वारंवार होणारे आदिवासी समाजावर चे अत्याचार रोखावेत. आरोपींना अटक केली असली तरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार मणिपूरला उशिराने जाग आली याचे वाईट वाटते अशी प्रतिक्रिया आदिवासी आमदारांनी व्यक्त केली आहे..
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मणिपूर अत्याचार घटने संदर्भात नुकतेच महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांची महाराष्ट्रातील आदिवासी लोकप्रतिनिधी आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भवनात भेट घेतली. यावेळी त्यांना शिष्टमंडळाने सविस्तर निवेदन सादर केले. मणिपूर घटनेच्या विषयावर त्यांच्याशी सविस्तर चर्चा देखील केल्याचं कळतंय. यावर रमेश बैस यांनी देखील सकारात्मक प्रतिक्रिया देत या निवेदनाची दखल घेतली जाईल, आणि केंद्राच्या पाठोपाठ महाराष्ट्रात देखील कुठल्याही आदिवासी व्यक्तीवर असे अत्याचार सहन केले जाणार नाही असं सर्व आमदारांना आश्वस्त केलं.
या आदिवासी आमदारांच्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष नाशिकचे नरहरी झिरवाळ, खासदार राजेंद्र गावित, इगतपुरीच्या आमदार मंजुळा गावित, नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीष नाईक, अक्कलकुवाचे आमदार आमशा पाडवी, हिरामण खोसकर, काशीराम पावरा, आमदार दिलीप बोरसे यांचा समावेश होता.
नंदुरबार हुन नारायण ढोडरेसह नाशिकहून तेजस पुराणिक, एमडी टीव्ही न्यूज ब्युरो मुंबई..