MANIPUR VIOLENCE PROTEST:आदिवासी संघटनांच्या हाकेला नंदुरबारमधील व्यापारी, व्यावसायिक, राजकीय पक्षांची साद..

0
778

शहादा /नंदुरबार -२७/७/२३

मणिपूर येथील महिला अत्याचारासंदर्भात विविध आदिवासी संघटनांनी एकत्र येत बुधवारी (ता. २६) पुकारलेल्या नंदुरबार जिल्हा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला.

नंदुरबार तालुक्यातील रनाळे येथे व शहादा तालुक्यातील पाडळदे येथे बसवर किरकोळ दगडफेक वगळता बंद शांततेत पाळण्यात आला. दरम्यान, बंदकाळात जिल्हाभर पोलिस बंदोबस्त तैनात होता.मणिपूरच्या घटनेबाबत विविध आदिवासी संघटनांसह सामाजिक संघटना, राजकीय पक्ष व व्यापारी व्यावसायिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. (Manipur Violence Protest Strict lockdown was observed everywhere in nandurbar news )

1
2
3
4
5

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

आठवड्याभरापासून शासन, प्रशासनास विविध संघटनांकडून निषेध व्यक्त करणारे तसेच आरोपींना कडक शिक्षा करण्याची निवेदने देण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातील विविध आदिवासी संघटना एकत्र आल्या.
त्यांनी मंगळवारी (ता. २५) झालेल्या बैठकीत बुधवारी नंदुरबार जिल्ह्यात बंद पाळण्याचा निर्णय घेऊन व्यापारी व्यावसायिकांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बुधवारी नंदुरबार शहरातील व्यापारी व्यवसायिकांसह जिल्ह्यातील तालुका व आठवडे बाजारपेठ असलेल्या गावांमध्येही कडकडीत बंद पाळून घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला.
एकाही व्यापाऱ्याने आपली प्रतिष्ठाने उघडली नाहीत. त्यामुळे नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील मुख्य बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक पी .आर. पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त तैनात होता. बंदमुळे ग्रामीण भागातील लोकांनी शहरात येणे टाळले. बंदच्या काळात काही ठिकाणी शाळा व वाहतूकही काही प्रमाणात बंद होती.
दरम्यान, सकाळी दहाच्या सुमारास नंदुरबार आगारातून दोंडाईचाकडे जाणाऱ्या बसवर रनाळे गावाजवळ अज्ञात व्यक्तीने दगड भिरकवला. त्यानंतर ते पसार झाले. शहादा तालुक्यातील पाडळदा येथेही असाच प्रकार घडला. या दोन घटना वगळता जिल्हाभर बंद शांततेत पार पडला.
माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून निषेध:
मणिपूर येथील अत्याचाराच्या घटनेचा माजी आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी निषेध केला. घटनेतील आरोपींना कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मणिपूर येथे दोन आदिवासी महिलेची विवस्त्र धींड काढून अत्याचाराच्या घटनेच्या सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. माणुसकी हाच सर्वांत मोठा धर्म असून, मणिपूरसारखी घटना अन्यत्र कुठेही घडू नये, त्यासाठी जनतेने एक संघ राहावे, असे आवाहनही रघुवंशी यांनी केले.

माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्याकडून निषेध:

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सारंगखेडा येथे शंभार टक्के प्रतिसाद:

मणिपूर येथील घटनेचा निषेध करत समाजकंटकांना तत्काळ अटक करून तो गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवून त्यांना त्वरित फाशीची शिक्षा मिळावी, यासाठी नंदुरबार जिल्हा आदिवासी संघटनेने पुकारलेल्या बंदला सारंगखेडा येथे शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. सर्व व्यावसायिक, व्यापाऱ्यांनी आपली आस्थापना बंद ठेवून बंद यशस्वी केला.
मंगळवारी (ता. २५) एकलव्य आदिवासी क्रांती दल, नंदुरबार शाखा, सारंगखेडा यांच्याकडून पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले. त्याचबरोबर एकलव्य आदिवासी क्रांती दलाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी गावात फिरून आस्थापना बंद ठेवण्यासंदर्भात व्यापाऱ्यांना आवाहन केले होते. या आव्हानाला व्यापाऱ्यांनी बुधवारी प्रतिसाद दिला.
धानोरा येथे निषेध:
ग्रामस्थांनी गाव बंद ठेवून मणिपूर घटनेचा निषेध केला. मणिपूर येथील अत्याचाराच्या निषेधार्थ गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. दिवसभर गावात शांतता होती. मुख्य बाजारपेठेसह संपूर्ण गावात शुकशुकाट होता. गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस निरीक्षक जगन वळवी, जमादार वंतू गावित, नारायण भिल, अंकुश गावित यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
शहाद्यात प्रांतधिकाऱ्यांना निवेदन:
आदिवासी संघटनांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरासह ग्रामीण भागात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच व्यापाऱ्यांनी आपली प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने बंद केली. दरम्यान, विविध आदिवासी संघटनांनी निषेध मोर्चा काढत प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. तालुक्यात एका बसच्या काचा फोडण्यात आल्या. याव्यतिरिक्त कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. बंदमुळे शहरात अत्यावश्यक सेवा वगळता सर्वत्र शुकशुकाट होता.
या वेळी विविध आदिवासी संघटनांतर्फे बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून मोर्चा काढण्यात आला. या वेळी विविध महापुरुषांच्या पुतळ्यांना व स्मारकांना अभिवादन करण्यात आले.
मोर्चा प्रांताधिकारी कार्यालयात येऊन प्रांताधिकारी सुभाष दळवी यांना निवेदन दिले. दरम्यान, सकाळी शहादा पुनर्वसन ही बस (एमएच १४, बीटी २३०८) आगारातून मार्गस्थ झाल्यानंतर अज्ञात व्यक्तींनी बसच्या काचा फोडल्याने एसटीच्या फेऱ्या काही काळासाठी बंद करण्यात आल्या होत्या. दुपारी दोनदरम्यान फेऱ्या पूर्ववत सुरू करण्यात आल्या. बसफेऱ्या बंद असल्याने शाळा, महाविद्यालयातील उपस्थितीवरही परिणाम झाला.
दरम्यान,ज्येष्ठ साहित्यिक वाहरुरू सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजित पाटील, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रा. मकरंद पाटील, उपसभापती डॉ. सुरेश नाईक, जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे,भाजप आदिवासी आघाडीचे लक्ष्मीकांत वसावे, झेलसिंग पावरा, सुरेश मोरे, दंगल सोनवणे, दीपक ठाकरे, रिपाइंचे जिल्हाध्यक्ष अरविंद कुवर, राष्ट्रवादीचे सुरेंद्र कुवर, चंद्रसिंग बर्डे, अनिल कुवर, सुभाष नाईक, एकनाथ नाईक, धर्मा नाईक, परेश पवार, सूरज ठाकरे, गोपाळ गांगुर्डे, इरफान पठाण, रंजना कान्होरे, भिकू पावरा, ऊर्मिला पावरा, संतोष निमगुळे, राजा वाघ, डॉ. सुलतान मेमन, छोटू शेख, रफिक मेमन, फारूक बागवान, कमर अली, नासीर पठाण आदींनी निषेध केला.
चोख पोलीस बंदोबस्त :
उपविभागीय पोलिस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला होता.

वृत्तसंकलन :प्रतिनिधी – रवींद्र राजपूत,नारायण ढोडरे [ नंदुरबार ],संजय मोहिते/जगन ठाकरे [शहादा ],शुभम भंसाली[अक्कलकुवा ] ,नितीन गरुड,महेंद्र सूर्यवंशी [तळोदा ] गोपाल पावरा [धडगाव ] गणेश कुवर [ सारंगखेडा ] … एम डी टी व्ही न्यूज,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here