तळोदा /नंदुरबार -२१/७/२३
स्वाभिमानी मराठा महासंघ देशात मराठा समाजाला एकत्र करण्यासाठी प्रयत्न करत आहे . मराठा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी गोर गरीब मराठ्यांना सोबत घेऊन वाटचाल सुरू आहे .याच धर्तीवर स्वाभिमानी मराठा महासंघाच्या गुजरात प्रदेशाध्यक्षपदी मनोज पवार यांची नियुक्ती संघटनेचे संस्थापक डॉ कृषिराज टकले पाटील यांनी केली आहे.
मनोज पवार हे गेल्या 25 वर्षांपासून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी लढत असून ते मराठा कल्याण ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष असून त्याचबरोबर मराठा फेडरेशनचे कार्य करीत आहेत.या कामाची दखल घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
मनोज पवार यांनी नियुक्तीप्रसंगी सांगितले की, गुजरात राज्यात स्वाभिमानी मराठा महासंघाच्या माध्यमातून मराठा समाजाला एकजूट करुन समाजाची उन्नती,प्रगती करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. शेतकरी,व्यावसायिक रोजंदारीने काम करणाऱ्या गरीब मराठा बांधवांना आरक्षण या विषयावर संघटना विधायक कार्य करेल.
मनोज पवार यांच्या निवडीचे स्वागत राष्ट्रीय अध्यक्ष मराठा रामनारायण, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलेश धुमाळ पाटील, राष्ट्रीय सरचिटणीस राजबीर सिंह, चिटणीस सलील सुर्यवंशी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गौरव पवार, प्रदेश कार्याध्यक्ष दिपक पवार, महाराष्ट्र राज्य निरिक्षक अंकुश डांभे, शेतकरी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सुभाष गागरे , महाराष्ट्र राज्य महिला आघाडीच्या प्रदेश अध्यक्ष अनिता पाटील, बेळगाव जिल्हा अध्यक्ष राजु सावंत, युवती प्रदेशाध्यक्ष दिपिका भामरे,आदिंनी केले आहे.
महेंद्र सूर्यवंशी ,प्रतिनिधी ,तळोदा शहर ,एम डी टी व्ही न्यूज