नंदुरबारमध्ये विवाहितेची आत्महत्या; सासरच्यांनी छळ केल्याचा आरोप | Marriage suicide in Nandurbar; Allegation of torture

0
530
Marriage suicide in Nandurbar; Allegation of torture

Nandurbar : घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत लक्ष्मी यांच्या माहेरचे सुरत येथून दाखल झाले होते.

शहरातील जयहिंद कॉलनीत राहणाऱ्या २४ वर्षीय विवाहितेने २४ ऑक्टोबर रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी विवाहितेला सासरच्यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

download

मृत विवाहितेचे नाव लक्ष्मी योगेश जाधव असे आहे. तिचा विवाह जयहिंद कॉलनीतील योगेश कन्हैय्या जाधव याच्यासोबत झाला होता. विवाहानंतर काही महिन्यातच पती योगेश हा लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय घेऊन छळ करत होता. लक्ष्मीच्या पोटातील बाळ आपले नसल्याचे सांगून तो तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता.

पतीसोबत सासू-सासरे आणि दीराकडूनही लक्ष्मीला छळ होत होता. यामुळे हताश झालेल्या लक्ष्मीने २४ ऑक्टोबर रोजी दुपारी सासरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मयत लक्ष्मीच्या माहेरच्या नातेवाईकांनी नंदुरबार उपनगर पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी लक्ष्मीच्या सासरच्यांनी तिचा छळ केल्याचा आरोप केला.

पोलिसांनी मयत लक्ष्मीची आई आशाबाई विजय आविळे यांच्या फिर्यादीवरून योगेश जाधव (२८), सासरे कन्हैय्या विश्वनाथ जाधव (५९), सासू सोनीबाई जाधव (५०) आणि दीर अजय कन्हैय्या जाधव (२५) यांच्याविरोधात विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक माधुरी कंखरे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here