एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयास गतवैभव मिळावे – छगन भुजबळ

0
120

मुंबई: १३/०२/२०२३

एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय,मुंबई १८७२ सुरू झालेली जुनी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहे. सदर शाळेचा बहुतांश भाग इतर कार्यालयीन कामांकरिता वापरला जात आहे.

bhujbal.mumbai.1

या शाळेच्या इमारतीमधील इतर शासकीय कार्यालये अन्य ठिकाणी स्थलांतरित करावे आणि आगामी शैक्षणिक वर्षापासून एल्फिन्स्टन तंत्र विद्यालय व कनिष्ट महाविद्यालय,मुंबई येथे पूर्णवेळ विविध नवीन तांत्रिक व्यवसाय अभ्यासक्रम सुरु करून या शाळेला गतवैभव प्राप्त करून द्यावे अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयातील माजी विद्यार्थी उत्कर्ष समितीच्या शिष्टमंडळाने आज माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली.

आणि या संस्थेच्या विविध अडचणी सांगितल्या यावेळी या समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण नानेकर, सरचिटणीस विनोद जठार, सहचिटनिस सुरेश वाव्हळ, खजिनदार सुभाष पवासे, इ. उपस्थित होते…

bhujbal.mumbai.1 1

त्यानंतर भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवले.आपल्या पत्रात छगन भुजबळ लिहितात की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्व.श्री. प्रमोद नवलकर यांच्यासह अनेक आदरणीय व्यक्तींनी माझ्या या शाळेत शिक्षण घेतलेले आहे. अशा शाळेला व वास्तुला अखेरची घटका मोजत असल्याची अवकळा यावी याबदल खेद वाटतो.

आज जागतिक स्तरावर तांत्रिक शिक्षणाला मोठी मागणी असताना या शाळेची अधोगती व्हावी यासारखे दुर्दैव नाही.

ते म्हणाले की,

केंद्र सरकारच्या नवीन शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत व्यवसाय शिक्षणाला महत्व देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंत शालेय शिक्षणासोबत व्यवसाय शिक्षण देण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणापूर्वीच महाराष्ट्र राज्याने व्यवसाय शिक्षणाला महत्व दिले आहे. शालेय शिक्षणाला तांत्रिक व्यावसायिक विषयांची जोड देऊन ६वी ते ८ वी प्रास्ताविक व्यवसाय अभ्यासक्रम ( Introductory Vocational Course) व ९ वी ते १२ अभ्यासक्रमांतर्गत एकात्मिक व्यावसायिक शिक्षणाची (Integrated Vocational Course) जोड देवून हे नवीन अभ्यासक्रम एल्फिन्स्टन तांत्रिक शाळेमध्ये सुरु करावेत.”

नाशिकहून तेजस पुराणिकसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here