पुणे:१३/०२/२०२३
‘बिग बॉस 16’ च्या पर्वाला 1 ऑक्टोबर 2022 पासून सुरूवात झाली होती. प्रेक्षकांमधील सर्वात लोकप्रिय असल्याने बिग बॉस 16 हा कार्यक्रम टीआरपीमध्येही टॉपला राहिला. यादरम्यान घरातील स्पर्धकांनी प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन केलं .
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सलमान खानने (Salman Khan) ‘बिग बॉस’च्या (Bigg Boss 16 Grand Finale) विजेत्याला ट्रॉफी दिली. यावर्षी ‘शिव ठाकरे’ (Shiv Thackeray), ‘ एम. सी. स्टॅन’,’ प्रियांका चहर चौधरी’, ‘अर्चना गौतम’ आणि ‘शालीन भानोत’ हे स्पर्धक टॉप 5 मध्ये दाखल झाले.
या पाच जणांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. 12 फेब्रुवारी 2023 ला ‘बिग बॉसच्या महाअंतिम सोहळ्यात रात्री 12 वाजता या पर्वाच्या विजेत्यांचा नाव घोषित केलं गेलं.बिग बॉस १६ च्या पर्वाचं विजेतेपद पुण्याचा रॅपर एम सी स्टॅनच्या नावावर झाले आणि मराठमोळ्या शिव ठाकरेला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले.
एमसी स्टॅनने शिव ठाकरेला हरवल्याने सर्वांनाच आश्चर्याच्या धक्का बसला.कारण सुरुवातीपासून शिव ठाकरेंचं खेळ खेळण्याची स्टाईल सर्वाना आवडत होती.
मात्र गेल्या काही आठवड्यात एमसी स्टॅनने जबरदस्त खेळी केली.बिग बॉस 16 च्या ट्रॉफीवर एम सी स्टॅनने स्वतःच नाव कोरल.बिग बॉस 16 चे हे पर्व जिंकल्यानंतर ट्रॉफीसोबतच एमसी स्टॅनला 31 लाख 80 हजार आणि नवीकोरी कार जिंकण्याचा मान मिळाला आहे.एम.सी स्टॅन बद्दल बोलायचं झालं तर त्याने वयाच्या 12 व्या वर्षी संगीतक्षेत्रात पदार्पण केलं.
‘समझ मेरी बात को’ या गाण्याच्या माध्यमातून त्याच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.त्यानंतर त्याचे ‘अस्तगफिरुल्ला’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं.
पुणेहून एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ..