शहीद दिनी जिल्हाधिकारी कार्यालयात जागवल्या क्रांतिकारांच्या आठवणी..

0
119

नंदुरबार : २३/३/२३

देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या भगत सिंह (Bhagat Singh), राजगुरु (Rajguru) आणि सुखदेव (Sukhdev) यांना आजच्याच दिवशी 1931 मध्ये लाहोर जेलमध्ये फाशी देण्यात आली होती.

त्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ देशभरात 23 मार्च हा ‘शहीद दिन’ (Shaheed Diwas) म्हणून मानला जातो.

ब्रिटीश  सायमन  कमिशनचा विरोध करणारे लाला लजपत राय यांचा इंग्रजांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला.

यामुळे चंद्रशेखर आझाद, भगतसिंह, राजगुरू, सुखदेव आणि अन्य क्रांतिकारकांनी लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्याचा निर्णय घेतला.

शेवटी त्यांनी 17 डिसेंबर 1928 रोजी ब्रिटिश अधिकारी साँडर्सला गोळ्या घालून ठार केले होते.

या प्रकरणी इंग्रजांनी भगत सिंह, राजगुरू व सुखदेव यांना अटक करून फाशीची शिक्षा सुनावली.

23 मार्च 1931 रोजी संध्याकाळी 7 वाजून 33 मिनिटांनी तिघांना फाशी देण्यात आली.

फाशीच्या वेळी तिघांनी ‘मेरा रंग दे बसंती चोला, माय रंग दे; मेरा रंग दे बसंती चोला।’ हे गाणे गायले होते.

शहीद दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद क्रांतिकारी भगतसिंग, राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी कल्पना निळ-ठुबे, तहसिलदार उल्हास देवरे, नायब तहसिलदार राजेंद्र चौधरी यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

प्रविण चव्हाण एम. डी. टी.व्ही न्यूज, जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here