महिला विकासासाठी ” यांचा ” पुढाकार .. कामाची दखल घेत करण्यात आला सन्मान..

0
124

शिंदखेडा /धुळे -२८/४/२३

महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन महिला आर्थिक विकास महामंडळ धुळे द्वारा संचलित कल्पतरू लोकसंचालित साधन केंद्र शिंदखेडा व नव तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास कार्यक्रमांराबवला जातो ..

1
2
3

शिंदखेडा तालुक्यातील वीस गावातील पुरुषांचा “सुधारक सन्मान सोहळा” शिंदखेडा तहसीलदार कार्यालयात संपन्न झाला.
सदर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून नायब तहसीलदार बन्सीलाल वाडीले लाभले होते.
प्रमुख पाहुणे शिंदखेडा पोलीस निरीक्षक सुनील बी भाबड , कल्पतरू लोक संचलित साधन केंद्र शिंदखेडा सचिव नलिनी पाटील आदी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात महिलांच्या सन्मानार्थ काम करणाऱ्या, महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या, महिलांना वेळोवेळी मदत करणाऱ्या वीस गावातील पुरुषांची निवड करून त्यांच्या कार्यात भर पडावी म्हणून गावपातळीवरील पुरुषांचा तालुका च्या अधिकाऱ्यांच्या हस्ते सन्मान सोहळा संपन्न झाला.
यावेळेस सन्मान स्वीकारणाऱ्या पुरुषांनी आपल्या मनोगतात म्हटलं की गेला दहा-पंधरा वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे
अद्याप कोणीही आमची दखल घेतलेली नसून महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आमचे दखल घेऊन आमचा जो सन्मान केला आहे याबद्दल आम्ही त्यांचे कायम ऋणी राहू.
कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी मनोगत व्यक्त केले ..
सदर कार्यक्रमास वीस गावाहून 200 पेक्षा अधिक महिला उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्पतरू लोकसंचालित साधन केंद्र शिंदखेडा व्यवस्थापक भुषण ब्राम्हणे, उपजीविका सल्लागार संदीप पाटील, लेखापाल यश मराठे, संयोगिनी ,अन्नपूर्णा सावंत, रत्न पाटील, प्रियंका ठाकूर, वैशाली निकुंबे, संजूम खाटीक यांनी प्रयत्न केले…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भूषण ब्राम्हणे यांनी केले
तर आभार संदीप पाटील यांनी मानले.
यादवराव सावंत,शिंदखेडा प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here