Meson Valves Shares : ‘या’ स्टॉकने केले गुंतवणूकदारांना  अवघ्या 4 महिन्यातच मालामाल झाले..!

0
102
meson-valves-shares-made-investors-rich-in-4-months
मेसॉन वाल्वच्या ( Meson Valves  shares ) शेअर्सने गुंतवणूकदारांना अवघ्या 4 महिन्यातच 585 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा आयपीओ 102 रुपयांच्या किमतीत आला होता, जो आता 705.25 रुपयांवर पोहोचला आहे. यामुळे गुंतवणूकदारांची खऱ्या अर्थाने चांदी झाली आहे.

Meson Valves  shares : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी आजची बातमी खूपच स्पेशल राहणार आहे. मेसॉन वाल्वच्या शेअर्सने ( Meson Valves  shares ) गुंतवणूकदारांना अवघ्या 4 महिन्यातच 585 टक्क्यांचा परतावा दिला आहे. कंपनीचा आयपीओ ( IPO ) 102 रुपयांच्या किमतीत आला होता, जो आता 705.25 रुपयांवर पोहोचला आहे.

Meson Valves  shares

दीर्घ कालावधीसाठी शेअर बाजारात ( Share Market ) गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. अनेक प्रसंगी असेच आढळून आले आहे. गुंतवणूकदारांनी जर एखादा योग्य स्टॉक निवडला आणि त्यामध्ये दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर त्यांना चांगले रिटर्न मिळतात यात शंकाच नाही.

मात्र शेअर बाजारात असेही काही स्टॉक ( Stock ) आहेत जे अल्पावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. मेसॉन वाल्व हा त्यापैकीच एक स्टॉक आहे. या कंपनीचा आयपीओ 102 रुपयांच्या किमतीत आला होता. अवघ्या 4 महिन्यांच्या काळात या स्टॉकने 585 टक्क्यांचे रिटर्न दिले आहेत.

काल या कंपनीचे ( Meson Valves  shares ) स्टॉक 716 रुपयांवर पोहोचले होते. हा स्टॉक चा 52 आठवड्याचा हाय लेवल आहे. स्टॉकचा 52 आठवल्यांचा लो लेवल 193.80 रुपये एवढा आहे.

यामुळे ज्यावेळी कंपनीचा आयपीओ आला त्यावेळी ज्या गुंतवणूकदारांनी यात गुंतवणूक केली आहे त्यांना अल्पकालावधीत चांगला बंपर परतावा मिळाला आहे.

शेअर बाजारात चढ-उतार सुरू असते यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञ लोकांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here