नंदुरबार :- जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात ‘ऑपरेशन अक्षता’ मोहीम सुरु असून यातून बालविवाहना आळा बसल्याचे दिसून येत आहे. या मोहिमेंतर्गत म्हसावद पोलिसांनी पिप्राणी येथे जाऊन बालविवाह रोखला आहे.
महिलांविषयक कौटुंबीक हिंसाचार व अन्य अत्याचाराच्या घटनांना आळा घालून त्यावर उपाययोजना करणे या उद्देशाने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ऑपरेशन अक्षता’ हा उपक्रम ८ मार्च २०२३ रोजी जागतिक महिला दिनानिमित्त नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे सुरु करण्यात आला आहे. दिनांक १४ जून रोजी पोलीस अधीक्षक श्री.पाटील यांना म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील पिप्राणी गावात एका अल्पवयीन मुलीचा चिरडे ( ता. शहादा) येथील तरुणाशी बालविवाह होणार असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत श्री.पाटील यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार यांना कळवून सदरचा बालविवाह थांबवून अल्पवयीन मुलीच्या पालकांचे समुपदेशन करण्याचे आदेश दिले होते.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NE
त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री.पवार यांनी म्हसावद पोलीस ठाणे स्तरावरील अक्षता सेलच्या सदस्यांच्या मदतीने माहिती काढली असता पिप्राणी गावातील एका अल्पवयीन मुलीचा चिरडे गावातील एका तरुणासोबत विवाह निश्चित करुन दि.१४ जून रोजी साखरपुडा होणार असल्याचे समजले. दरम्यान, त्यापूर्वीच म्हसावद पोलीस ठाण्याचे पथकाने अल्पवयीन मुलीच्या घरी जावून अल्पवयीन मुलगी, वर मुलगा व त्यांचे कुटुंबीय, व गावातील नागरिक कायदेशीर बाबी समजावून सांगून त्यांचे समुपदेशन करुन त्यांना बालविवाह करण्यापासून परावृत्त केले. सदर अल्पवयीन मुलीला बालकल्याण समिती नंदुरबार यांचे समक्ष हजर करुन तिचेे व तिच्या कुटुंबीयांचे सदर समितीमार्फत समुपदेशन करुन सदर अल्पवयीन मुलगी १८ वर्षे वयाची होईपर्यंत तिचे शिक्षण, आरोग्य व कल्याणाची जबाबदारी सदर समितीमार्फत घेतली जाणार आहे.
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी – MDTV NE
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार जिल्हा पोलीसांना ‘ऑपरेशन अक्षता’ अंतर्गत तब्बत २७ बालविवाह रोखण्यात यश आले आहे, असे पोलीस अधीक्षक श्री.पी.आर.पाटील यांनी सांगितले. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, सहा. पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग राजपुत, पोलीस हवालदार कलीम रावताळे, पोलीस अंमलदार राकेश पावरा, महिला पोलीस अंमलदार वर्षा पानपाटील, पिप्राणी गावाचे माजी पोलीस पाटील भिमसिंग चौधरी यांनी केली आहे.
एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.