नंदुरबार : ४/४/२०२३
नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील लोभानी शासकीय आश्रम शाळेच्या प्रांगणात नुकतंच कार्यक्रम पार पडला..
तो होता रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पालकमंत्र्यांनी नियुक्ती आदेशाचे वाटप केलं..
राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रम शाळांमधील रिक्त पदे भरून आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्य सह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांवर अधिक भर देण्यात येईल असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केलं.. ते तळोदा तालुक्यातील लोभानी शासकीय आश्रम शाळेच्या कार्यक्रमात बोलत होते…
यावेळी त्यांच्या हस्ते रोजंदारीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आल्या संदर्भातलं नियुक्ती आदेशाचं वाटप करण्यात आलं…
यावेळी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी देखील मनोगत व्यक्त केले…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/36S6BFu
यावेळी व्यासपीठावर खासदार डॉक्टर हिना गावित विधान परिषदेचे आमदार अमशा पाडवी, आदिवासी विकास चे आयुक्त नयना गुंडे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मंदार पत्की, आदिवासी विकास चे नाशिकचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत उपस्थित होते..
ढोल वादन व नृत्याने मान्यवरांचा स्वागत करण्यात आलं…
कर्मचाऱ्यांना नियुक्ती आदेशाचा वाटप करण्यात आलं..
सूत्रसंचालन के टी पाटील व सुधाकर मोरे यांनी केलं…
मंदार पत्की यांनी प्रास्ताविक केलं…
सहाय्यक प्रकल्प अधिकारी बी.एफ वसावे ,डी.जी वाणी ,बी .आर. मुगळे यांच्यासह आश्रम शाळेचे मुख्याध्यापक आणि सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले
प्रवीण चव्हाण, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी, एम.डी. टी.व्ही न्यूज नंदुरबार