नंदुरबार :- जिल्हा परिषदेतील शिक्षण विभागात दिव्यांग अल्पदृष्टी प्रवर्गाचे खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून प्राथमिक शिक्षकपदाची नोकरी व मुख्याध्यापक पदोन्नतीचा लाभ, शिक्षण विस्तार अधिकारी लाभ घेतल्याच्या तक्रारीवरून चौकशीत खोटे व बनावट प्रमाणपत्र असल्याचे निष्पन्न झाल्याने उमर्दे (ता. नंदुरबार ) येथील प्राथमिक शाळेतील पदोन्नती मुख्याध्यापक यांना निलंबित करण्यात आले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिलेल्या निलंबन आदेशात म्हटले आहे की, ६ डिसेंबर २०२२ च्या पदोन्नती समितीने दिव्यांग अल्पदृष्टी प्रवर्गात विस्ताराधिकारी ( शिक्षण ) या पदावर पदोन्नतीसाठी संदीप प्रकाश रायते यांची निवड केली होती व आदेशदेखील निर्गमित केले होते. मात्र रायते यांच्या पदोन्नतीबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्याने त्यांना पदोन्नतीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याने व त्यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली होती.
याचिकेचा निकाल ७ फेब्रुवारी २०२३ ला पारित झाला असून उच्च न्यायालयाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी निर्णय घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत. तक्रारीमुळे अध्यक्ष, वैद्यकीय मंडळ तथा अधिष्ठाता आणि जे.जे. रुग्णालय मुंबई येथे रायते यांच्या अल्पदृष्टी दिव्यांग असल्याबाबतची शारीरिक तपासणी करून अहवाल मागविण्यात आला होता. त्या अहवालान्वये दिव्यांग अल्पदृष्टीचे प्रमाण शून्य असल्याचा अहवाल प्राप्त झालेला आहे. यावरून संदीप रायते सामान्य जिल्हा रुग्णालय अहमदनगर यांच्याकडील दिव्यांग अल्पदृष्टीचे छोटे / बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून जिल्हा परिषद शिक्षणसेवक पदावर नंदुरबारमध्ये नोकरीचा लाभ घेतलेला आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
तसेच वैद्यकीय मंडळ भाऊसाहेब हिरे गव्हन्मेंट मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, धुळे यांच्याकडील दिव्यांग प्रमाणपत्र बनावट व खोटे सादर करून मुख्याध्यापकपदावर पदोन्नतीचा लाभ घेतलेला आहे. यावरून रायते दिव्यांग अल्पदृष्टी प्रवर्गाचे खोटे व बनावट दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून शासनाची दिशाभूल करून प्राथमिक शिक्षकपदाची नोकरी व मुख्याध्यापकपदी पदोन्नतीचा लाभ घेतलेला आहे . प्रशासकीयदृष्ट्या ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने रायते याना जिल्हा परिषद सेवेतून निलंबित करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद केले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार