MLA SATYAJIT TAMBE:नादुरुस्त जि. प. शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत? आमदार तांबेनी घेतली वृत्ताची दखल…

0
1007

अक्कलकुवा /नंदुरबार -१६/७/२३

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी भागातील अक्कलकुवा तालुक्यात आहे भांगरापाणी येथे जिल्हा परिषद शाळा.. मुळात जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी येण्यापासून तर शिकण्यापर्यंत अनास्था पाहायला मिळत असते.. त्यात ज्या वास्तूत त्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्या वास्तूत जर जीर्ण होऊ लागल्यात तर त्या विद्यार्थ्यांसाठी धोकादायक ठरू लागतात.. असाच काही प्रकार या जिल्हा परिषद शाळेच्या संदर्भात घडत आहे… अक्कलकुवा तालुक्यातील भांगरापाणी येथील जुन्या जीर्ण झालेल्या इमारती विद्यार्थ्यांसाठी अधिकच धोकादायक ठरू लागल्या आहेत… शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्हा परिषद शाळांसाठी कोट्यावधीचा निधी मंजूर केला.. मात्र भांगरापाणी जिल्हा परिषद शाळेच्या वर्ग खोल्या अपघातांना आमंत्रण देत आहे.. वर्ग खोल्यांना खिडक्या दरवाजे तुटले असल्याने तसेच इमारतींचे छत उडाले असल्याने भिंती देखील पडल्या आहेत.. अशा स्थितीत प्राथमिक शिक्षण घेणं या जिल्हा परिषद शाळेतील मुलांना अधिकच बिकट झालंय.. आता ऐन मान्सूनच्या काळात शाळेत पाण्याची रिप् चालू होत असेल आणि अक्कलकुवा तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस होत असल्याने या भागातल्या जिल्हा परिषद शाळांची दुरावस्था अतिशय घातक ठरत आहे.. शाळांमध्ये जाण्यासाठी पायवाट आणि वाट कशी शोधायची हा गहन प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर उभा ठाकला आहे.. संभाव्य धोका टाळण्यासाठी शिक्षण विभागाने त्वरित उपाययोजना कराव्यात अन्यथा पालकांच्या रोषाला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही..

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे हि वाचा :

NASHIK :शासन आपल्या दारी कार्यक्रमाचा नाशकात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न ..

SHOCKING :’ या ‘ शाळेची दुरावस्था, विद्यार्थी जीव धोक्यात ?

1
2
3

एम डी टी व्हीनं 28 जून रोजी या प्रकरणाची दखल घेत बातमी प्रसारित केली होती.. या वृत्ताची दखल विधान परिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांनी घेतली आहे.. त्यांनी नुकताच एमडीटीवीशी संपर्क केला आणि संपूर्ण माहिती जाणून घेतली.. नाशिक प्रतिनिधी तेजस पुराणिक यांच्याशी यासंदर्भात सखोल चर्चा केल्यावर या प्रश्नावर त्वरित तोडगा निघण्यासाठी पत्रव्यवहार संबंधित विभागाशी आमदारांमार्फत करण्यात येईल आणि आमदार कार्यालयामार्फत त्याचा पाठपुरावा त्वरित घेण्यात येईल अशी माहिती आमदारांच्या सूत्रांकडून कळली.. वारंवार अशी प्रकरण नंदुरबार जिल्ह्यात घडत असतील तर शिक्षण विभागासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते.. शिक्षण हक्क कायद्यानुसार विद्यार्थ्यांना कोणत्याही शिक्षणापासून आपण वंचित ठेवता येऊ शकत नाही मात्र ज्या इमारतीत शिक्षण घ्यायचा आहे ती इमारत जर दुरावस्थेत असेल तेथील स्थानिक प्रशासन,जिल्हा परिषद शिक्षण विभाग प्राथमिक अक्कलकुवा पंचायत समिती शिक्षण विभाग येथील संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून त्वरित उपाययोजना करण्याची गरज येऊन ठेपली आहे.. त्यामुळे आता या शाळेच्या पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या नजरा लागून आहेत आमदार सत्यजित तांबे नेमका काय पाठपुरावा करतात आणि नेमकं या विद्यार्थ्यांच्या हाती सुखाचे क्षण कधी येतात? पाचवीला पूजलेल्या प्रशासनाला जाग कधी येणार ? हा सवाल पुन्हा एकदा आम्ही या माध्यमातून प्रशासनाला विचारत आहोत. थांबवा आता विद्यार्थ्यांचा हा शिक्षणाशी होणारा खेळ खंडोबा.. आमदार सत्यजित तांबे यांनी लवकरात लवकर या प्रकरणात लक्ष घालून पाठपुरावा करावा आणि संबंधित विद्यार्थ्यांना आणि पालकांना न्याय मिळवून द्यावा हीच अपेक्षा..
नाशिकहून तेजस पुराणिकसह नितीन गरुड तळोदा ग्रामीण प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here