नंदुरबार -९/४/२३
आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था नवापूर संचलित माध्यमिक विद्यालय नागझरी ता. नवापूर येथे मानव विकास मिशन योजने अंतर्गत इयत्ता ८ वीत शिकत असलेल्या मुलींसाठी सायकल वाटप कार्यक्रम तालुक्याचे आमदार तथा संस्थेचे कार्याध्यक्ष मा.श्री.आमदार शिरीषकुमारजी नाईक साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत नागझरी च्या सरपंच सौ. कुसुमताई प्रकाश गावित या अध्यक्ष स्थानी होत्या.
आता WhatsApp वरमिळवाब्रेकिंगन्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्णमाहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/36S6BFu
तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष मा. श्री. आरीफभाई बलेसरिया, सहसचिव मा. श्री. अजय पाटील, शालेय समिती अध्यक्ष मा. श्री. जी. के. पठाणसाहेब, नागझरी ग्रुप ग्रामपंचायत माजी सरपंच मा. श्री. विक्रमदादा गावित, पंचायत समिती नवापूर निवृत्त अभियंता मा. श्री. तुकाराम गावित, ग्रामपंचायत वडखुट उपसरपंच मा. श्री. दिगंबर गावित, मा. श्री. प्रकाश कालिदास गावित, श्री राहुल गावित, श्री मथुसेल गावित, श्री. सुमन दादा गावित श्री. अरुण गावित, श्री. दिनेश गावित श्री. रामकृष्ण दादा गावित, श्री. निमजी गावित, श्री. अर्जुन गावित, शासकीय वसतिगृह गृहपाल श्री. नेहेते सर आदी मान्यवर तसेच पालक, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. विनय गावित यांनी प्रास्ताविक केले.
आमदार मा.आमदार श्री. शिरीषकुमारजी नाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. संजय ठोसरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. महेंद्रसिंग वसावे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले…
नारायण ढोडरे
प्रतिनिधी:-ग्रामीण नंदुरबार