नंदुरबार -१८/६/२३
MODI@9महासंपर्क अभियान : केंद्रातील मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्या निमित्त संपूर्ण देशभरात महासंपर्क अभियान राबवले जात आहे. याच कार्यक्रमांतर्गत तळोदा तालुक्यातील व शहरातील व्यापाऱ्यांची चर्चा,विचार व विनिमय मेळावा आयोजन करण्यात आलं..
नऊ वर्षापूर्ती निमित्त मोदी ॲट नाईन महासंपर्क अभियान देशभर राबवलं जातंय.या अभियानांतर्गत घेण्यात येत असलेल्या व्यापारी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद सध्या मिळत आहे ..नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तळोदा विधानसभा मतदार संघात आमदार राजेश पाडवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा नुकताच पार पडला..गेल्या नऊ वर्षात केंद्र सरकारने राबवलेल्या विविध योजनांची माहिती तसेच विविध लाभार्थी विविध व्यापारी यांच्याशी संवाद साधण्याच्या हेतूने या व्यापारी मेळाव्याचे आयोजन नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहरात करण्यात आलं होतं..
हे सुध्दा वाचा
“बिपरजाॅय”… नंदुरबारला धोका नाही …! – MDTV NEWS
फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS
मंत्रिमंडळ निर्णय : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १५०० कोटी रुपयांस मंजुरी
यावेळी, व्यापारी मेळाव्याला संबोधित करताना आमदार राजेश पाडवी म्हणाले,”
- * मोदी साहेबांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे राष्ट्रीय व्यापार कल्याणकारी मंडळाची स्थापना करून देशभरातील लहान-मोठे कोट्यावधी व्यापाऱ्यांना या मंडळात अंतर्भूत केल्याने अनेक योजनांचा फायदा होतोय..
•देशात व्यापाऱ्यांसाठी नवोद्योगिक उभारण्यासाठी शेकडो योजना केंद्र सरकारने व्यापाऱ्यांसाठी खुल्या केल्या आहेत.
•व्यापारी वर्गात अतिशय सुरक्षतेच सुलभतेच वातावरण आपल्याला मागील नऊ वर्षात तुम्ही अनुभवताय..
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्यासह नंदुरबार लोकसभा निवडणूक प्रमुख तुषार रंधे होते…तळोदा शहरातील विविध व्यापारांनी या संपूर्ण मेळाव्याला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद नोंदवला..
माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्यासह जिल्हा महामंत्री बळीराम पाडवी, शहादा तळोदा विधानसभा निवडणूक प्रमुख कैलास चौधरी, नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष गौरव आणि, तालुकाध्यक्ष प्रकाश वळवी, तालुका प्रभारी नारायण ठाकरे, शेतकरी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्याम राजपूत, व्यापारी आघाडी शहर अध्यक्ष दीपक कलाल यांच्यासह तळोदा शहरातले विविध व्यापारी या व्यापारी मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते
महेंद्र सूर्यवंशी ,तळोदा तालुका प्रतिनिधी, एम डी टी व्ही न्यूज..