नंदुरबार : २४/३/२३
सोशल मीडिया असो instagram असो, फेसबुक असो का ट्विटर या समाज माध्यमांवर विविध स्वरूपाचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसतात..
त्यात सध्या एका व्हिडिओला नेटिजन्स कडून जोरदार पसंती मिळत आहे..
वीज वसुली बाबत तयार केलेल्या गाण्याबद्दल.. ऐकून नवल वाटलं ना..
मार्च महिना म्हणजे करवसुलीचा महिना यात विविध विभागातील अधिकाऱ्यांना करवसुलीचे उद्दिष्ट असल्यानंतर त्यांच्यापुढे डोकेदुखीच ठरते..
जेव्हा अधिकार वापरून वसुली होत नाही तेव्हा वेगवेगळ्या शक्कल लढवाव्या लागतात ..
अशीच एक शक्कल लढवली आहे मंदाने युनिटच्या काही कर्मचाऱ्यांनी..
खानदेशी गाण्यातून वसुलीचा जागर सुरू केलाय…
सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून या कर्मचाऱ्यांच्या नामी शक्कलच कौतुक देखील सर्वत्र होतंय..
हे आहेत मंदाना युनिट चे वरिष्ठ तंत्रज्ञ सिकंदर शाह आणि सहाय्यक संजय शिरसाट..
विज बिल भरण्याबाबत विनंती करू नये अनेक जण वीज बिल भरत नसल्याने युनिट मधील कवळीथ, टूकी,सोनवद आधी गावांची विज बिल वसुली करण्याची जबाबदारी घेतली.. राज्यभर धुमाकूळ घालत असलेल्या झुमका वाली पोरं या अहिराणी गाण्याची मदत घेत मनी पैसा वाली ताई जरा वीज बिल भरी देव बाई असे गाणे म्हणत विजेचे फायदे आणि विज नसल्यास येणाऱ्या अडचणी याबाबत जनजागृती केली…
विज बिल भरण्यासाठी महिला भगिनींना साकडं घातलं…
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.https://bit.ly/36S6BFu
याचा परिणाम गेल्या दोन दिवसात परिसरातील 35 ते 40 जणांनी बिल भरणा केल्याची माहिती समोर आली…
विज बिल त्वरित भरवण्यासाठी या केलेल्या आयडिया चा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्व दूर व्हायरल झाल्याने या गाण्याचे कौतुक देखील तितकच होतंय..
आणि या कर्मचाऱ्याच्या कल्पकतेला सुद्धा आमचा सलाम..
तुटपूजा आणि कमी पगारावर काम करणारे हे कर्मचारी इतक्या कल्पकतेने वसुली करण्यासाठी शक्कल लढवतात तेव्हा नक्कीच ते कौतुकास पात्रही ठरतात..
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक, एम.डी. टी.व्ही. न्यूज नंदुरबार