मान्सून राज्यात दाखल पण ……. उत्तर महाराष्ट्रात अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच !

0
183

राज्यात मान्सून दाखल झाला आहे. ठाणे, मुंबई आदी भागात वरुणराजा दिलखुलासपणे बरसतो आहे. मात्र उत्तर महाराष्ट्रात अद्यापही जोरदार पावसाचे आगमन झालेले नाही. धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात अद्यापही पेरणीयोग्य पाऊस नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरीप हंगामासाठी शेतीची आंतर्गत मशागत, बियाणे, रासायनिक खते खरेदीतून लाखो रुपयांचा खर्च करून शेतकरी वरुणराजाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

दरवर्षी केरळमध्ये १ जून रोजी येणारा मान्सून यंदा ४ जून रोजी आला. संपूर्ण राज्यात १५ जूनला हजेरी लावणारा मान्सून ह्यावर्षी २५ जून रोजी आला. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनच्या आगमनामध्ये उशीर झाला होता, पण गेल्या काही दिवसात पुणे, मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग सुरू आहे. राज्यात पुढील पाच दिवस मान्सून कसं असणार याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

रविवारी मान्सूनच्या आगमनासोबत मुंबईत मुसळधार पाऊस झाल्याने भारतीय हवामान विभागाने मंगळवार व बुधवारसाठी मुंबई शहरासह शेजारील ठाणे आणि पालघर जिल्हयांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मंगळवार आणि बुधवार २४ तासांच्या कालावधीत ११५.५ मिमी पेक्षा जास्त मुसळधार पावसाच्या शक्यतेबद्दल नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पुण्यातील आयएमडीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ केएस होसाळीकर यांच्या मते उत्तरेकडे सरकत असताना मुंबई आणि उपशहरासह कोकणात मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे. ज्यामुळे कोकण, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रासाठी देखील अलर्ट जारी केले आहेत. विदर्भात काही भागांमध्ये यल्लो अलर्ट देण्यात आला आहे. तर नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… नंदुरबार पालिकेच्या पाच शाळा झाल्या डिजिटल….! | MDTV NEWS

बापरे … झोपलेला महिलेला बिबट्याने उचलून नेले … तळोदा तालुक्यातील घटना; लचके तोडल्याने महिला गतप्राण | MDTV NEWS

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली… | MDTV NEW

आयएमडी मुंबईच्या शास्त्रज्ञ सुषमा नायर यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील अतिवृष्टी तीन सिनोप्टिक परिस्थितींमुळे होऊ शकते. “ओडिशामध्ये कमी दाबाचा पट्टा असून तो मध्य प्रदेशकडे सरकण्याचा अंदाज आहे. शिवाय एक मजबूत ऑफशोअर कुंड आहे. शेवटी, ईशान्य अरबी समुद्र आणि लगतच्या गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळ आहेत. या सिनोप्टिक परिस्थितींमुळे पश्चिमेकडील प्रदेश तीव्र होत असून मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार / मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here