एकाच ठिकाणी मिळतात 600 पेक्षा जास्त पान, एकाची तर आहे तब्बल दीड लाख किंमत! ..

0
135

नाशिक :२४/२/२०२३

आपल्या देशात पानाचे शौकीन खूप आहेत.

जेवण झाल्यानंतर अनेकांना पान खायला आवडतं. 

पान खाण्याचा शौक असलेली दर्दी मंडळी नित्यनेमाने एखाद्या दुकानात जाऊन पानाचा आस्वाद घेत असतात.

नाशिकमध्ये पान शौकिनांसाठी माऊली फॅमिली पानहाऊस मध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल 600 पेक्षा अधिक प्रकारचे पान बनतात. 

बाहेरून येणारे पर्यटक देखील इथं पान खाण्यास पसंद करतात.

कोणी सुरु केलं पान हाऊस?

गणेश डुकरे या तरुणाने हे माऊली फॅमिली पान हाऊस सुरू केलं आहे.

बीए डिग्री पूर्ण केल्यानंतर गणेश नोकरीच्या शोधात होता. अनेक ठिकाणी त्याने नोकरीचा शोध घेतला.

मात्र, त्याला मनासारखी नोकरी मिळाली नाही.

त्यामुळे नंतर आपण काहीतरी व्यवसाय करायचा असं त्यांने ठरवलं आणि गणेशने माऊली फॅमिली पान हाऊस सुरु केलं. 

गणेशने मसाला पानाचा अभ्यास करून विविध प्रकारचे फ्लेवर तयार केले.

जवळपास 600 पेक्षा अधिक प्रकारचे पानांचे फ्लेवर गणेशकडे आहेत.

अगदी 30 रुपयांपासून तर दीड लाख रुपयांपर्यंत पान त्याच्याकडे मिळते.

कोणत्या प्रकारचे पान मिळतात?

माऊली फॅमिली पान हाऊसमध्ये तुम्हाला 600 पेक्षा अधिक प्रकारचे पान खायला मिळतील.

चंदन मसाला पान, नवाबी पान, चीज चॉकलेट पान, खसखस स्पेशल पान, राजधानी एक्सप्रेस पान, रजनीकांत पान, महफिल पान, नाईट कविन पान, मुमताज स्पेशल पान, सिल्व्हर मसाला पान, विजयवाडा पॅटर्न पान,

मथुरा पॅटर्न पान, इंदोर पॅटर्न पान, गुलाब मसाला पान, केशरी कस्तुरी पान ही मसाला स्पेशल पान मिळतील.

अनेक पान शौकिनांची पसंती याच पानांना जास्त असते.

पेशवाई गोल्ड पानाची जोरदार चर्चा

माऊली फॅमिली पान हाऊसमध्ये तब्बल दीड लाख रुपयांचे पेशवाई गोल्ड पान मिळते.

या पानाची सर्वत्र जोरदार चर्चा आहे. ज्या वस्तू शरीरासाठी चांगल्या गुणकारक आहेत. अशा 18 आयुर्वेदिक वस्तूंपासून हे पान बनवलं जात.

हे पान खाण्यासाठी तब्बल दीड लाख रुपये मोजावे लागतात.

पान हाऊसमध्ये मिळतोय चांगला नफा

नोकरी लागली नाही म्हणून हतबल होऊ नका एखादा व्यवसाय सुरू करा.

मी देखील नोकरीच्या शोधात होतो. मात्र, जेव्हा मी व्यवसायात उतरलो तेव्हा पूर्ण लक्ष हे व्यवसायात दिले.

आज माझा स्वतःचा एक ब्रँड तयार झाला आहे.

आणि अनेक ग्राहकांची पसंती मिळत आहे.

त्यामुळे मला यातून चांगला नफा मिळतोय, अशी माहिती माऊली फॅमिली पान हाऊसचे मालक गणेश डुकरे यांनी दिली आहे.

कुठे आहे माऊली फॅमिली पान हाऊस?

नाशिक शहरापासून साधारणता 10 किलोमीटर अंतरावर मखमलाबाद दरी-मातोरी रोडला माऊली फॅमिली पान हाऊस आहे.

तेजस पुराणिक,जिल्हा प्रतिनिधी ,एम .डी .टी .व्ही. न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here