महिला दिनी अवतरल्या ” या ” महिला शिशुविहार शाळेत ..

0
544

नाशिक : ८/३/२०२३

महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा होतो ..

तसाच उत्साह नाशकातील सी एच एम ई सोसायटीच्या शिशुविहार बालवाडी विभागाच्या मराठी शाळेत पाहावयास मिळाला ..त्यानिमित्त माता पालक स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होत ..

८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.

दहा तासांचा दिवस आणि कामाच्या जागी सुरक्षितता ह्या मागण्या केल्या.

या दोन मागण्यांबरोबरच लिंग, वर्ण, मालमत्ता आणि शैक्षणिक पार्श्वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली.

स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ, ८ मार्च हा ‘जागतिक महिला-दिन’ म्हणून स्वीकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता.

पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले.

तेव्हापासून हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो ..

त्यापार्श्वभूमीवर नाशकात विविध शैक्षणिक संस्थांमध्ये ह्या दिवसाची रेलचेल पाहावयास मिळाली ..

शिशुविहार बालवाडी विभागाच्या मराठी शाळेत अनोख्या स्वरूपात माता पालक स्पर्धा घेऊन मातांना वेशभूषा परिधान करून स्वतःला त्या स्त्रियांच्या भूमिकेत साकारण्याची आणि माहिती देऊन व्यक्त करण्याची संधी मिळाली ..

विभाग प्रमुख वैशाली भट यांनी प्रथम कार्यक्रमाची भूमिका मांडली ..

तर विविध मातांनी आपल्या पाल्यासह पारंपरिक स्त्री भूमिका वेशभूषा परिधान करून नारीशक्तीचा जागर केला ..

त्यात एकूण १२ माता पालकांनी सहभाग घेतला ..

सुवर्णा पाटील इंगळे यांनी सैनिकाची माता तर कु अर्णिका इंगळे हिने विक्रम बत्राची भूमिका साकारली .. पाहू या हा व्हिडिओ

सुवर्णा पाटील इंगळे यांनी सैनिकाची माता तर कु अर्णिका इंगळे हिने विक्रम बत्राची भूमिका साकारतांना

तर दीप्ती कुलकर्णी यांनी सीतेची आई सुनयनाची भूमिका तर कु आदिश्री कुलकर्णी हिने सीता भूमिका साकारली होती ..

आर्यन बोरसे याने सिंधुताईंचा मुलगा आणि वैशाली बोरसे यांनी सिंधुताई सपकाळ भूमिका साकारून त्यांच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकला ..

कुमार कैवल्य नमित शेलार याने कृष्णाची भूमिका तर त्याच्या आई सौ जयश्री शेलार यांनी यशोदेची भूमिका साकारून कृष्ण गवळण गाऊन एक चैतन्य निर्माण केलं ..

कुमार कैवल्य नमित शेलार याने कृष्णाची भूमिका तर त्याच्या आई सौ जयश्री शेलार यांनी यशोदेची भूमिका साकारतांना

विविध माता पालकांनी आणि त्यांच्या पाल्यांनी सक्रिय सहभाग घेतला ..

परीक्षक म्हणून सुनंदा वाघ लाभल्या होत्या ..

यावेळी पालक उपस्थित होते ..

या स्पर्धा उपक्रमाला मार्गदर्शन शालेय समिती अध्यक्षा आसावरी धर्माधिकारी यांचं लाभलं होतं .. यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर महिला कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केलं होतं ..
तेजस पुराणिक जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here