साक्री/धुळे -२८/५/२३
साक्री तालुक्यातील महिर येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन संसदरत्न खासदार डॉ.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले.
खासदार डॉ हिना गावित यांनी आपल्या मतदार संघाच्या विकास कामांना प्रथम प्राधान्य देत साक्री तालुक्यातील महिर या गावी विविध विकासकामांचे भूमिपूजन केले.
यात जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना,डोंगरी विकास कार्यक्रमाअंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करणे,मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत महिर ते कृष्णानगर रस्त्यावर पूल बांधणे, नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत RO फिल्टर बसवणे इत्यादी कामांचा शुभारंभ करण्यात आला.
साक्री शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर वसलेले हे गाव आहे.
या गावात मुलभूत सुविधांचा अभाव आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
लहान गाव असुन गावाची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार अठराशे आहे.
गावात कुठलेही सरकारी बँक अथवा सहकारी बँक नाही.
आपल्या मतदारसंघातून मूलभूत सुविधेपासून कोणीही जनता वंचित राहू नये याच धर्तीवर आपल्या मतदारसंघाच्या तळागाळातील लोकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवून लाभ नागरिकांना मिळालाच पाहिजे.
हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून खासदार डॉक्टर हिना गावित यांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन केले.
कार्यक्रमात गावातील तसेच साक्री तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रसंगी परीसरातील सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
नितीन गरुड ,तळोदा तालुका प्रतिनिधीसह एम डी टी व्ही न्यूज ब्युरो ,साक्री/धुळे