धुळे : महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब व गट-क सेवा संयुक्त पुर्व परिक्षा ३० एप्रिल, २०२३ रोजी धुळे शहरातील एकूण २५ परिक्षा केंद्रावर होणार असुन ह्या परीक्षेस ९ हजार ७४४ विद्यार्थी बसणार आहे. परिक्षा सुरळीत पार पडण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, धुळे तृप्ती थोडमिसे यांनी परिक्षा केंद्राचे आवारापासून २०० मीटर अंतरापर्यंत फोजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (२) चे मनाई आदेश जारी केले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर मनाई आदेश परिक्षेच्या दिवशी सकाळी ८ ते दुपारी १ वाजेपावेतो संबंधित परिक्षा केंद्राचे परिसरात लागू राहतील. परिक्षा केंद्राचे २०० मीटर परिसरात परिक्षार्थीशिवाय इतर कोणासही प्रवेश असणार नाही. कोणतेही शस्त्र बाळगता येणार नाही किंवा शारीरिक दुखापती / इजा होईल अशी कोणतीही वस्तु बरोबर नेता येणार नाही.
परिक्षा केंद्राचे 200 मीटर परिसरातील झेरॉक्स मशीन, फॅक्स मशीन, लॅपटॉप, एस.टी.डी. बुथ, ई-ल, इंटरनेट सुविधा केंद्र बंद राहतील. परिक्षार्थीना मोबाइल, पेजर, गणकयंत्र इत्यादीचा वापर परिक्षा केंद्राचे परिसरात करता येणार नाही, असेही श्रीमती धोडमिसे यांनी आदेशात म्हटले आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार. धुळे.