शिंदखेडा तालुका काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला मातापित्यांचा जाहीर सत्कार..
धुळे -१०/६/२३
शिंदखेडाची कन्या कुमारी हर्षदा सुनील देसले तिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कृषी उपसंचालक पदावरील स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवलं
शहरातील तिच्या राहत्या घरी तिचा जाहीर सत्कार काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आला
असा होता तिचा शैक्षणिक प्रवास:
कुमारी हर्षदा ही लहानपणापासूनच हुशार होती
पहिली ते चौथी पर्यंतचे तिचं शिक्षण किसान हायस्कूल तर इयत्ता पाचवी ते दहावी गर्ल्स हायस्कूल या ठिकाणी झाले
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण एमएचएस महाविद्यालयात केले यानंतर तिने धुळे येथील कृषी विद्यालयात बीएससी ऍग्री याचे शिक्षण पूर्ण केले
राहुरी कृषी विद्यापीठात तिने एम एस सी पूर्ण करून सुवर्णपदकाची ती मानकरी ठरली
या माध्यमातून तिने स्पर्धा परीक्षेची वाट धरली
आणि अखेर तिने तिचं स्वप्न पूर्ण केलं
आज ती कृषी विभाग वर्ग एक उपसंचालक कृषी विभागातील सर्वोच्च पदावर तिची यशस्वी निवड झाली
आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांना सत्यात उतरवलं
हा आनंद तिच्या चेहऱ्यावर मावेनासा झाला होता
अशी होती तिची कौटुंबिक पार्श्वभूमी:
गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीतून वर आली हर्षदा
सर्वसामान्य परिवारातील एका हात मजुरी करणाऱ्या कुटुंबीयांची मुलगी आहे कुमारी हर्षदा
वडील शेतमजुरी करत परिवाराचा उदरनिर्वाह चालवतात
तिच्या वडिलांनी 1989 स* स्वतःच संजय सायकल माडी या नावाने व्यवसाय सुरू केला आणि ते आज तागायत करीत आहे
अशा परिस्थितीत संसार सांभाळून त्यांनी कुमारी हर्षदा ला उच्च शिक्षण दिलं
गरीब प्रतिकूल परिस्थितीत आई-वडिलांनी केलेल्या श्रमाचे चीज करण्यात कुमारी हर्षदा हिला यश आलं..
यानिमित्ताने धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शामकांत सनेर यांच्या हस्ते तिचा पालकांचा सत्कार करण्यात आला
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्राध्यापक सुरेश देसले, प्रकाश पाटील शरद पाटील, राजेंद्र देवरे माजी विरोधी पक्षनेते सुनील चौधरी, शिंदखेडा काँग्रेसचे दिनेश माळी, दीपक अहिरे, शामकांत पवार ,गोटू महाले, घनश्याम पाटील, सुभाष देसले ,कैलास वाघ, छोटू ठाकूर उपस्थित होते
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
यावेळी तिच्या आई-वडिलांचा यथोचित गौरव करण्यात आला..
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने एम डी टी व्ही न्यूजला याबाबत प्रतिक्रिया देण्यात आली..
कुमारी हर्षदाच्या पुढील वाटचालीस एम डी टी व्ही न्यूजच्या हार्दिक शुभेच्छा
यादवराव सावंत शिंदखेडा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज धुळे..