MUKESH AMBANI :24 तासात कमावले 1,90,00,00,00,00,000…रुपये..

0
249

मुंबई -६/७/२३

Reliance Mukesh Ambani Net Worth: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती यांनी फक्त एका दिवसात 19 हजार कोटी रुपयांची कमााई केली आहे. यामुळे आता मुकेश अंबानी ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सच्या 13 व्या स्थानावर पोहोचले आहेत. भारताच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी पुन्हा एकदा जगातल्या टॉप-15 श्रीमंताच्या यादीत (Top-15 Billionaires) स्थान मिळवलं आहे. टॉप 10 मध्ये जागा बनवण्यसाठी त्यांना आता फक्त 3 उद्योगपतींना मागे टाकायचं आहे. यात मुकेश अंबानी यांना जास्त कालावधी लागणार नाही. कारण त्यांच्या पुढे असलेल्या तीन उद्योगपतींच्या आणि मुकेश अंबानी यांच्या कमाईत जास्त अंतर नाही. 24 तासात 2 अरब डॉलर
गेल्या 24 तासात मुकेश अंबानी यांनी 2 अरब डॉलरहून अधिकची कमाई केली आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती आता 90 अरब डॉलरवर पोहोचली आहे. या संपूर्ण वर्षाचा विचार केला तर आतापर्यंत मुकेश अंबानी यांनी या वर्षात आतापर्यंत 3.46 अरब डॉलरचा फायदा झाला आहे.

WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती ! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

पहिल्या स्थानावर कोण:
जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अव्वल स्थानावर टेस्लाचे सीईओ एलन मस्क (Elon Musk) कायम आहेत. त्यांची एकूण संपत्ती जवळपास 247 अरब डॉलर इतकीआहे. गेल्या चोवीस तासात त्यांनी तब्बल 13 अरब डॉलरची कमाई केली आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर मेटाचे मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) आहेत. त्यांनी या वर्षात आतापर्यंत 58.6 अरब डॉलरची कमाई केली आहे.
मुकेश अंबानी यांची भरारी
2016 पर्यंत अंबानी 38 व्या क्रमांकावर होते आणि गेल्या दहा वर्षांपासून फोर्ब्स मॅगझिनच्या यादीत त्यांनी भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे.
एम डी टी व्ही न्यूज ब्युरो मुंबई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here