मुंबई तुंबली…. पुढील काही तास होणार जोरदार पाऊस !

0
384

मुंबई :- गेल्या अनेकदिवसापासून प्रतीक्षा लागलेल्या वरुणराजाने आज आषाडीला राज्यभर हजेरी लावली. लांबलेला पाऊस आज सुरू झाला आणि पावसाने मुंबईसह राज्याच्या इतर शहरांमध्ये दमदार बॅटिंग सुरू केली आहे. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईत जोरदार पावसामुळे शहरातील काही ठिकाणी पाणी भरले आहे.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

बिपरजोय वादळामुळे मान्सूनची थांबलेली आगेकूच सुरु झाली असून हवामान खात्याने मंगळवार आणि बुधवार जोरदार पावसाचा इशारा दिल होता. गेल्या काही तासांपासून जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे मुंबईची तुंबई झाली आहे. तसेच पुढील तीन-चार तास मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे तज्ञ के.एस. होळकर यांनी ही माहिती दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

मुंबईत मुसळधार पावसाला सुरवात झाली असून मुंबई महापालिकेच्या नागरिकांना महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर आणि उपनगरमध्ये मध्य स्वरूपाचा पाऊस व काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेने भरती-ओहोटीची माहिती आणि वेळ दिली आहे. महानगरपालिकेने ही माहिती ट्विट करत दिली आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

हे सुध्दा वाचा

Nandurbar News… वर्षभर साजरा करणार नंदुरबारचा रौप्य महोत्सव : पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित | MDTV NEWS

Good News…नंदुरबार जिल्ह्यातील मुस्लिम बांधवानी घेतला निर्णय…. ईदला बकरीची कुर्बानी नाही ! | MDTV NEWS

नंदुरबार पोलिसांनी रोखला अजून एक बालविवाह … पळून जावून विवाह करणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलीचे केले समुपदेशन ! | MDTV NEWS

Nandurbar Police… कत्तलीसाठी बांधून ठेवलेल्या १२८ गोवंशाची केली सुटका…! | MDTV NEWS

हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार ठाणे आणि पालघरमध्येही जोरदार पाऊस होत आहे. ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस होत असून सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे ठाणे शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या वंदना सिनेमा आणि चरई या ठिकाणी दोन फुटांपर्यंत पाणी भरले आहे. त्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. भिवंडीमध्ये सुद्धा जोरदार पावसामुळे शहरातील तीनबत्ती, भाजीमार्केट, बाजारपेठ परिसरात दोन ते तीन फुटांपर्यंत पाणी भरले आहे. तर आजूबाजूच्या अनेक दुकानात पाणी शिरले आहे. या प्रकारामुळे करोडो रुपये खर्च करून महापलिकेने केलेल्या नालेसफाई फोल ठरली असून नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, मुंबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here