नंदुरबारात अतिक्रमणावर फिरला पालिकेचा बुलडोझरचा हातोडा

0
1040

दोनवेळा २४ तासांचा अल्टिमेटम देऊनही स्वताहून अतिक्रमण न काढल्याने कारवाई

दुपारून अचानक सुरु झालेल्या कारवाईने व्यावसायिकांची उडाली धांदल

नंदुरबार : शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर हातगाड्या लावण्यात येत असल्याने रहदारीस अडथळा निर्माण होऊन अपघातासह वादाच्या घटना वाढल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर नंदुरबार पालिकेने अतिक्रमण काढून घेण्याच्या सूचना व्यावसायिक व इतर अतिक्रमणधारकांना दिल्या होत्या.

स्वताहून अतिक्रमण न काढून घेतल्यास अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्याचा इशारा मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी नोटिसीद्वारे दिला होता.

त्यानंतर दिनांक २१ पासून दोन वेळा २४ तासांचा अल्टिमेटम देण्यात आला होता.

मात्र, तरीही अतिक्रमण धारकांनी स्वताहून अतिक्रमण काढून न घेतल्याने आज दुपारी या अतिक्रमणावर पालिकेच्या बुलडोझरचा हातोडा फिरला.

यामुळे व्यावसायिकांची एकच धांदल उडाल्याचे दिसून आले.

8fd00876 3735 4442 b069 eff1b504bcd0
1
2

नंदुरबार शहरातील सार्वजनिक रस्त्यालगत केलेले अतिक्रमण, सार्वजनिक ठिकाणी हातगाड्या लावणे तसेच छोट्या टपऱ्या, ओटे, घराच्या बांधकामाच्या पायऱ्या काढून रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे सार्वजनिक वापराच्या रस्त्याच्या रुंदी कमी होवून वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होत आहे.

रस्त्याच्या रुंदीमुळे अपघातांमध्ये देखील वाढ होत आहे.

दरम्यान याप्रकरणी विविध नागरिक व संस्थांनी पालिकेकडे अतिक्रमणाबाबत तक्रारी केल्या आहेत.

यापार्श्वभूमीवर नंदुरबार पालिका प्रशासन आता अतिक्रमण हटविण्याबाबत ॲक्शन मोडमध्ये आली.

दि.२१ एप्रिल रोजी अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या.

मात्र त्यानंतर पालिका प्रशासनाच्यावतीने अतिक्रमण धारकांना दोन वेळा २४ तासाची मुदत देऊन स्वताहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले होते.

ee786c14 97b5 4c6a 94c4 326a80ca9f5d

दरम्यान, पालिकेने बजावलेली नोटीस व दोन वेळा संधी देऊनही अतिक्रमण धारकांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास अचानक मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन पोलिसांचा बंदोबस्त घेत अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरु केली. पंचायत समिती प्रेवेशद्वार समोरील रस्ता, उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूचे रस्ते ते गांधी पुतळा पर्यंतच्या रस्त्यावरील व डी.आर.हायस्कुल परिसरातील रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमण, शुभेच्छया फलक काढण्यात आले.

988f65f1 6090 4a54 8bc0 3f12bc9a0004

दुपारी ३ वाजेनंतर अचानक सुरु झालेल्या या कारवाईने व्यावसायिकांची एकच धांदल उडाल्याचे दिसून आले.

यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी पुलकीत सिंह यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

शहर पोलीस ठाण्याचे सपोनि प्रतापसिंग मोहिते व कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला.

रहदारीस अडथळा ठरणारे रस्ते मोकळे होण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी सदर मोहीम ही सुरु ठेवण्यात येणार आहे.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here