कुसुमाग्रजांच्या जयंतीदिनी नाशिकमध्ये माय मराठीचा जागर ..

0
318

नाशिक :२७/०२/२०२३

आज सर्वत्र कुसुमाग्रजांची अर्थात वि वा शिरवाडकर यांची १११ वि जयंती साजरी होतेय .

ती जयंती मराठी राजभाषा दिन म्हणून विशेषतः नाशकात उत्साहात साजरी होते .

येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानात अभिवादन करण्यासाठी मान्यवरांसह विद्यार्थ्यांनी देखील भेट दिली ..

कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज ह्यांना ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित केल्यानंतर कुसुमाग्रजांना अभिप्रेत असलेले सामाजिक सांस्कृतिक प्रकल्प उभे करणे, अशा प्रकल्पांना प्रोत्साहन देणे ह्या प्रेरणेतून २६ मार्च १९९० रोजी कुसुमाग्रज प्रतिष्ठानची स्थापना नाशिक येथे झाली.

तेव्हापासून कुसुमाग्रजांनी मांडलेल्या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी प्रतिष्ठान कार्य करीत आहे.जयंती दिनी त्यांच्या आठवणींना उजाळा देणे त्यासह विविध उपक्रमाचं आयोजन केलं जातं.

या संदर्भात आम्ही जाणून घेतली प्रतिक्रिया प्रतिष्ठानचे सल्लागार ऍड. राजेंद्र डोखळे यांची ऐकू या काय म्हणालेत ते ..

या स्मारकाला म्हसरूळ येथील स्पार्कल प्री स्कुलच्या विद्यार्थ्यांनी प्रतिष्ठानला भेट दिली .

कुसुमाग्रजांच्या आठवणी आणि त्याच्या विविध साहित्य संपदांविषयी माहिती जाणून घेतली.

यानंतर या चिमुकल्यांनी छोट्या तोंडी मोठा घास म्हणतात ना त्यानुसार काव्यवाचन केलं … या सादरीकरणाला उपस्थितांनी दाद दिली आणि यांचं कौतुक केलं.. ऐकू या विद्यार्थ्यांचा काव्यविष्कार …

01
02

तर तात्यासाहेबांची खरी ओळख या मुलांना व्हावी म्हणून त्यांना घेऊन स्मारकाला भेट देण्याचं प्रयोजन केलं .. असं शाळेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हंटल .. ऐकू या त्यांची नेमकी भूमिका

कुसुमाग्रजांना सामाजिक, आर्थिक व तंत्रज्ञानाच्या प्रगतीपासून वंचित असलेले गरीब व असहाय्य लोकांबद्दल दया व आदिवासींबद्दल कळवळा होता.

त्यांच्या कार्याचा स्त्रोत म्हणजे सुबत्तेकडून गरजूंकडे जाणारा मदतीचा स्त्रोत असे म्हणता येईल.

त्यांच्या ह्या आकांक्षांना पूर्ण करण्यासाठीच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन झाले.

मा. कुसुमाग्रज ह्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या आणि क्षणोक्षणी त्यांचे मार्गदर्शन लाभणार्‍या प्रतिष्ठानने चांगलेच मार्गक्रमण केलंय ..

मराठी भाषा दिनाच्या रूपाने माय मराठीचा जागर केला जातो आणि अभिमान बाळगला जातो ..

एका कवितेच्या या ओळी आठवण करून देतात,
”लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,धर्म ,पंथ,जात एक जाणतो मराठी… यावेळी प्रतिष्ठानचे मकरंद हिंगणे कार्यवाह ,लोकेश शेवडे सल्लागार,एडवोकेट राजेंद्र डोखळे विश्वस्त,अजय निकम खजिनदार हे मान्यवर उपस्थित होते ..
या बातमीसाठी नाशिकहून तेजस पुराणिक, जिल्हा प्रतिनिधी एम डी टी व्ही न्यूज नाशिक ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here