नंदुरबार -१४/७/२३
नाबार्डने जिल्ह्यात अनेक पथदर्शी प्रकल्प उभारले आहेत. म्हणून नाबार्डच्या माध्यमातून नंदुरबार जिल्हा विकासाच्याा प्रगतीपथावर आहे.
असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईनकरा. https://bit.ly/3UoK7E0
कोळदे येथील कृषी विज्ञान केंद्राच्या सभागृहात मंगळवारी नाबार्डच्या 42 व्या वर्धापन दिनानिमित्त एकदिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेच्या आयोजन करण्यातले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी मणिषा खत्री यांच्या हस्ते दिप प्रज्वलन आणि कृषी देवता भगवान बलराम यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाले.राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डचे सहाय्यक महाप्रबंधक प्रमोद पाटील यांनी प्रस्तावना केली.पाटील यांनी जिल्ह्यातील नाबार्ड आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.या कार्यशाळेस प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा कृषी अधीक्षक राकेश वाणी , जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी सचिन गांगुर्डे, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रीसे, पशुसंवर्धन तज्ञ डॉ. महेश अनापुरे,आरसीटीचे संचालक गणेश पठारे, कृषी विज्ञान केंद्राची वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, उपस्थित होते.
आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त तृणधान्य व रेशीम उत्पादनामधील संधी याविषयी तज्ञांनी मार्गदर्शन केले.
याच कार्यशाळेत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मार्गदर्शन केले.तसेच हैदराबाद येथील तृणधान्य शास्त्रज्ञ आशिष बिडकर व पुणे येथील महेश लोंढे यांचे ऑनलाइन चर्चासत्र झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषी विज्ञान केंद्राचे विशेषज्ञ जयंत उत्तरवार यांनी केले.या एकदिवशीय कार्यशाळेत डॉ. हेडगेवार सेवा समिती, डेव्हलपमेंट सपोर्ट सेंटर, रुलर फाउंडेशन, टाटा लेणी, बायफ, मावीम, आणि युवा मित्र या संस्थांसह शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी यांनी सहभाग नोंदविला.
प्रवीण चव्हाण ,नंदुरबार प्रतिनिधी ,एम डी टी व्ही न्यूज ..