Nadurbar News:  मद्यपी वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई; 4 दिवसांत 86 जणांवर गुन्हे दाखल Strict action against drunk drivers

0
165
Nandurbar News Strict action against drunk drivers

Nandurbar News –  मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघातांचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

नंदुरबार जिल्ह्यात मद्यपी वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई सुरू आहे. जिल्हा पोलिस दलाने 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबवून 86 मद्यपी वाहनचालकांवर गुन्हे दाखल केले आहेत.

या मोहिमेअंतर्गत नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाणे हद्दीत ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. या नाकाबंदीदरम्यान 86 वाहनचालकांनी मद्यप्राशन केलेले आढळून आले.

image 5

या वाहनचालकांवर नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात 8, उपनगर पोलिस ठाण्यात 4, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात 5, नवापूर पोलिस ठाण्यात 7, विसरवाडी पोलिस ठाण्यात 4, शहादा पोलिस ठाण्यात 10, धडगाव पोलिस ठाण्यात 3, म्हसावद पोलिस ठाण्यात 5, सारंगखेडा पोलिस ठाण्यात 2, अक्कलकुवा पोलिस ठाण्यात 22, तळोदा पोलिस ठाण्यात 6, मोलगी पोलिस ठाण्यात 4, शहर वाहतूक शाखेत 6 असे एकूण 86 गुन्हे दाखल करण्यात आले.

या गुन्ह्यांमध्ये दोषी आढळलेल्या वाहनचालकांचे परवाने (लायसन्स) निलंबित करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांच्या कार्यालयात पाठविण्यात येणार आहेत.

image 6

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की, मद्यपी वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांच्या जीवितासदेखील धोकादायक आहे. नागरिकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करून वाहन चालवू नये.

-पी. आर. पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक👮‍♂️

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here