नंदुरबार : १२ वी निकाल ; मुलींनी मारली बाजी !

0
163

जिल्ह्यात ९३.०३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९८ टक्के निकाल

नंदुरबार :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वीचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात नंदुरबार जिल्हयातील नियमीत विद्यार्थ्यांचा एकुण निकाल ९३.०३ टक्के लागला आहे. जिल्हयात ९४.८४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत तर ९०.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेबुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वी परीक्षेसाठी आज ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला. शहरातील विविध सायबरवर विद्यार्थी व पालकांची निकाल पाहण्यासाठी गर्दी दिसून आली. तर अनेकांनी दिलेल्या संकेतस्थळांच्या माध्यमातून घरी मोबाईलवर निकाल पाहिला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

निकाल पाहिल्यानंतर त्याठिकाणी जल्लोष पाहायला मिळाला. नंदुरबार जिल्हयात एकुण १६ हजार ५२५ नियमीत विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी झाली होती. त्यापैकी १६ हजार ४०० विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ठ होते. त्यातील १५ हजार २५७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हयाचा एकुण निकाल ९३.०३ टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेचा ९८.१२ टक्के सर्वाधिक निकाल!

नंदुरबार जिल्हयात विज्ञान शाखेत ८ हजार ९२९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ७६२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ४ हजार ६६६ विद्यार्थी व ४ हजार ९६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. विज्ञान शाखेचा निकाल ९८.१२ टक्के लागला आहे.
तर कला शाखेत ६ हजार ४१० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५ हजार ४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ३ हजार ६ विद्यार्थी व २ हजार ४६७ विद्यार्थिनींचा समावेश आहे. कला शाखेचा निकाल ८५.३८ टक्के लागला.
वाणिज्य शाखेत ८९१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८६४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यात ४९० विद्यार्थी व ३७४ विद्यार्थिनींचा समावेश आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९६.९६ टक्के लागला.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

व्होकेशनल अभ्यासक्रमासाठी १५० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १४० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १२० विद्यार्थी व २० विद्यार्थिनींचा समावेश आहे. व्होकेशनल अभ्यासक्रमाचा निकाल ९३.३३ टक्के लागला. तांत्रिक विज्ञान अभ्यासक्रमासाठी २० विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तांत्रिक विज्ञानचा निकाल ९० टक्के लागला आहे.

नंदुरबार जिल्हयात १६ हजार ६२५ विद्यार्थ्यांमध्ये ७ हजार ३८४ विद्यार्थिनींचा समावेश होता. यापैकी ७ हजार ३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ९४.८४ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्य आहेत.तर ९ हजार २४१ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ८ हजार ४०३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे ९०.९३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here