पालिका, तहसील आणि पोलीस प्रशासनाची संयुक्त कारवाई
नंदुरबार -६/७/२३
तहसिल कार्यालय, नगरपालिका कार्यालय आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने रस्त्यांना अडथळा ठरणारे आणि बेकायदेशीररीत्या उभारलेले फलक काढून टाकण्याची कारवाई काल मध्यरात्री पासूनच सुरू करण्यात आली. शहरातील सुमारे ७० फलके काढण्यात आली.
WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नंदुरबार शहरात बर्याच ठिकाणी नागरिक आणि व्यावसायिकांनी बेकायदेशीररीत्या फलके लावली होती. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याबाबत प्रशासनाकडे सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. काही फलकांमुळे वादही निर्माण होत होते. त्यामुळे वरील तीनही विभागाच्या संयुक्त कारवाईत अतिक्रमण निर्मूलनाची धडक मोहीम हाती घेण्यात आली. काल मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास तहसिल कार्यालय, नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्त्याला अडथळा ठरणारी तसेच बेकायदेशीर असलेले शहरातील सुमारे ७० फलके हटविण्यात आली. यात शहरातील सोनार खुंट, जळका बाजार, बागवान मोहल्ला, बाहेरपुरा, नेहरू पुतळा परिसर, अंधारे चौफुली, धुळे रोड, नाट्य मंदीर परिसर या भागातील अनधिकृत फलक हटविण्यात आले.
जीवन पाटील ,कार्यकारी संपादक ,एम डी टी व्ही न्यूज ,नंदुरबार