नंदुरबार: 90% पेक्षा जास्त मतदान करणारे BLO सत्कारित..

0
149

योगेश पाटील-संपादक-9960102404
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत मतदार जागृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी SVEEP उपक्रमांतर्गत सन 2019 मध्ये लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीत 50 टक्के पेक्षा कमी मतदान व 90 टक्के पेक्षा जास्त मतदान झालेल्या मतदान केंद्रातील BLO व ग्रामसेवक यांची आढावा व मार्गदर्शन बैठक जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नोडल अधिकारी सावन कुमार यांच्या अध्यक्षतेखाली तसेच उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.

‘एम.डी टीव्ही’ चं Facebook  Group जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा


बैठकीस नंदुरबार जिल्हयातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापूर या चारही विधानसभा क्षेत्रातील तहसिलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी(शिक्षण) उपस्थित होते.
या बैठकीत 90 टक्के पेक्षा जास्त मतदान केलेल्या अक्कलकुवा मतदार संघातील 12 BLO, नवापूर मतदार संघातील 8 BLO, नंदुरबार मतदार संघातील 2 BLO तसेच शहादा मतदान संघातील 04 BLO यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रातिनिधीक स्वरुपात या BLO कडून 90 टक्के पेक्षा जास्त मतदान करण्यासाठी केलेले प्रयत्न, राबविण्यांत आलेले उपक्रम इ. विषयी माहिती घेण्यात आली.


तसेच 50 टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्राचे अक्कलकुवा मतदार संघातील 11 BLO, नवापूर मतदार संघातील 20 BLO, नंदुरबार मतदार संघातील 37 BLO आणि शहादा मतदार संघातील 17 BLO कडुन त्या विषयीची कारणे जाणून घेऊन करावयाच्या उपाययोजना संदर्भात चर्चात्मक मार्गदर्शन करण्यांत आले. येणा-या काळात BLO नी राबवावयाचे उपक्रम याविषयी सविस्तर नियोजन देण्यांत आले असुन पुढील बैठकीत संबधीत BLO नी उपक्रमांची अंमलबजावणी करुन त्याविषयीचे सादरीकरण तयार करुन आणावयाच्या सूचना सर्वाना देण्यांत आल्या.

बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रमोद भामरे यांनी मार्गदर्शन केले.
​ तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तर जागृती मंच (BAG) स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
बैठक यशस्वी करण्यासाठी स्विप समितीचे सदस्य माध्यमिक उपशिक्षणाधिकारी डॉ. युनूस पठाण, मनोज अहिरराव यांनी कामकाज पाहिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here