Nandurbar Crime News : लग्नासाठी मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून नंदुरबारमधील गुजरातच्या युवकाचे अपहरण; 7 जणांना अटक

0
1522

Nandurbar Crime News : नंदुरबार जिल्ह्यात लग्नासाठी मुलगी दाखवण्याचे आमिष दाखवून एका गुजरातमधील युवकाचे अपहरण करण्यात आले. मात्र, वेळीच कारवाई केल्याने पोलिसांनी 7 जणांना अटक केली.

सुरत येथील किरणभाई देसाई यांना नंदुरबार जिल्ह्यातील रविभाई यांनी एका मुलीचा फोटो दाखवून लग्नासाठी स्थळ बघण्यास बोलावले होते. बुधवारी (ता. 18) किरणभाई देसाई त्यांच्या कुटुंबीयांसोबत प्रकाशा येथे पोहोचले. तेथे रविभाई यांनी त्यांना मुलगी दाखवली. मात्र, फोटो आणि प्रत्यक्ष मुलगी वेगळी असल्याचे किरणभाई देसाई यांना लक्षात आले.

त्यानंतर किरणभाई देसाई घरी जाण्यासाठी निघाले. तेव्हा रविभाई यांनी दोन मुलींना नंदुरबारला सोडून देण्यास विनंती केली. त्यांना गाडीत बसवून नंदुरबारकडे निघाले.

download

नंदुरबार शहराच्या अलीकडे वाहनातील दोनपैकी एकीने प्रकृती बरी नसल्याचा बनाव करून वाहन थांबविण्यास सांगितले. वाहन थांबविताच तेथे 30 ते 35 वर्षे वयोगटातील सात जण आले. त्यांनी दमदाटी करून किरणभाई देसाई आणि त्यांच्या कुटुंबीयांना रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात घेऊन गेले.

संशयितांनी किरणभाई देसाई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मोबाईल जबरीने हिसकावून घेतले. सुटकेसाठी दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली.

दरम्यान, नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याचे वाहन तेथून जात असताना पोलिसांना काहीतरी संशयास्पद प्रकार असल्याचे समजले. त्यांनी चौकशी केली असता संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि नंदुरबार तालुका पोलिस ठाण्याची वेगवेगळी पथके तयार करून कारवाई केली. ताब्यातील संशयितांकडून माहिती घेऊन वेगवेगळ्या ठिकाणावरून तीन महिलांसह सात संशयितांना ताब्यात घेतले.

संशयितांमध्ये साईनाथ उदयसिंग ठाकरे (रा. धमडाई), नीतेश नथ्थू वळवी (रा. कोळदा), रणजित सुभाष ठाकरे (रा. कोळदा), विशाल शैलेंद्र लहाने (रा. नंदुरबार) आणि तीन महिलांचा समावेश आहे.

जिल्हा पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले की, उर्वरित संशयितांनादेखील लवकरच ताब्यात घेण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here