नंदुरबार :- शहादा तालुक्यातील कलमाडी तह. येथे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. या स्फोटात घरातील संसारोपयोगी वस्तू व बचत केलेली रोकड जळून खाक झाली. ही घटना रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
कलमाडी तह येथील परशुराम हसरथ ठाकरे कुटुंबासह शेतीकाम करून उदरनिर्वाह करतात. त्यांची पत्नी छाया परशुराम ठाकरे आशा वर्कर असून त्या सायंकाळी आपले कार्य करून घरी आल्या. त्यावेळी त्या किचनमध्ये स्वयंपाक करण्यासाठी गेल्या असता त्यांना गॅस सिलिंडर लिक झाल्याच्या अंदाज आला. त्यामुळे त्यांनी आपल्या दोन मुलींसह घरातून तत्काळ बाहेर धाव घेतली.
हे सुध्दा वाचा
भावाचा खुनाचा असा घेतला त्यांनी बदला … चौघांना पोलिसांनी केली अटक – MDTV NEWS
नंदुरबारात ९ वर्षात विकासाला गती : कोट्यवधींची कामे – MDTV NEWS
शिरपूर तालुका पोलीस : अवैध मद्य वाहतूक करणारे वाहन ताब्यात .. – MDTV NEWS
त्याचवेळी गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता, की घरातील छत व भिंतीदेखील कोसळल्या. आगीच्या ज्वाला बाजूच्या परिसरापर्यंत पोचल्या. अचानक झालेला स्फोटाने परिसरातील नागरिक भयभीत झाले. परिसरातील नागरिकांसह गावातील पोलिस पाटील, ग्रामपंचायत सदस्य आदींनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
ठाकरे कुटुंबाने शासनाकडून मदतीची अपेक्षा केली आहे. मंडळ अधिकारी निशिगंधा साळवे, तलाठी पी.एच.धनगर यांनी पंचनामा केला. यावेळी मंदाणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जितेंद्र पाटील, पोलिस पाटील आत्माराम ठाकरे, ग्रामपंचायत सदस्य रवींद्र ठाकरे आदी उपस्थित होते.
एम.डी.टी.व्ही.न्यूज ब्युरो, शहादा-नंदुरबार