नंदुरबार जिल्हा पोलीस दल : ” या ” माध्यमातून भागवतय तहानलेल्यांची तृष्णा ..

0
209

नंदुरबार जिल्हा पोलीस प्रमुख पी आर पाटील यांच्या संकल्पनेतून उभारली पाणपोई..

नंदुरबार -२५/४/२३

नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून आदिवासी भागातील नागरीक रणरणत्या उन्हात आपल्या कामासाठी जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या ठिकाणी येत असतात
सध्या नंदुरबारचे तापमान हे 40 ते 44 अंशाच्या वर गेले आहेत.
जिल्ह्यातील व तालुक्यातील पाणपोईची संख्या कमी झाल्याने नागरिकांना दुपारी पिण्याच्या पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते.
ही बाब जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांना निर्देशानास आल्यानंतर. जिल्हा पोलीस अधीक्षक पी आर पाटील यांनी. 30 ठिकाणी पाणपोई सुरू केली आहे.
पाणपोई ची जबाबदारी ही पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्यावर देण्यात आली आहे.
या उपक्रमामुळे वाटसरूंची तहान तर भागेल मात्र पोलिसांनी सामाजिक भान ठेवून दातृत्व स्वीकारलं याच कौतुक केलं ते कमीच ..
जिल्ह्यातील बहुतांश लोक हे मजूरीसाठी बाहेरगांवी जातात.
तसेच उन्हाळ्यामध्ये लग्नसराई किंवा धार्मीक कार्यक्रम जास्त असल्यामुळे बहुतांश लोक हे प्रवास करतात. सर्वसामान्य नागरिक देखील खरेदीसाठी बाजारात आलेले असतात.
जे विद्यार्थी शिक्षणासाठी व कामानिमित्त बाहेरगांवी गेलेले असतात ते उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी परत येतात, अशा सर्वांना पैशाअभावी पिण्याच्या पाण्याची थंडगार बाटली घेणे शक्य होत नाही.
अशा सर्व नागरिकांसाठी स्वच्छ व थंड पाण्याची सोय व्हावी तसेच त्यांना नि:शुल्क पाणी उपलब्ध व्हावे आणि सर्वात महत्वाचे पाणपोईची दररोज स्वच्छता करुन त्यात स्वच्छ व थंडगार पाणी भरण्यात यावे अशी संकल्पना पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्हा मासिक गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचे समोर मांडली.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील नंदुरबार यांच्या संकल्पनेला जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देवून आप-आपल्या पोलीस ठाणे हद्दीत सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय करुन दिली.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

11 3
1
12 3
2
13 2
3
14 2
4

नंदुरबार शहर पोलीस ठाणे हद्दीत स्टेट बँक कॉलनी, पोलीस ठाणे समोर, नंदुरबार तालुका पोलीस ठाणे हद्दीत रनाळा, आष्टा व कोरीट नाका, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत- काकाचा ढाबा जवळ, धानोरा गावात पाणपोई उभी करण्यात आली ..
नवापूर
नवापूर पोलीस ठाणे हद्दीत- पोलीस ठाणेसमोर, अग्रवाल भवन व सामान्य रुग्णालय येथे, विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीत-जामा मशिद जवळ, स्टेट बँक येथे सोय करण्यात आलीय ..
शहादा आणि धडगाव –
शहादा पोलीस ठाणे हद्दीत- पोलीस ठाणे समोर, बस स्थानक व जनता चौक येथे, सारंगखेडा पोलीस ठाणे हद्दीत- सारंगखेडा व वडाळी गावात, धडगांव पोलीस ठाणे हद्दीत-पोलीस ठाण्यासमोर व धडगांव गावात, म्हसावद पोलीस ठाणे हद्दीत-पोलीस ठाण्यासमोर, कोचरा माता मंदीर व साई हॉस्पीटल जवळ सोय केलीय
अक्कलकुवा
अक्कलकुवा पोलीस ठाणे हद्दीत-पोलीस ठाण्यासमोर व खापर दुरक्षेत्र येथे पाणपोई उभी करण्यात आलीय
तळोदा
तळोदा पोलीस ठाणे हद्दीत-तहसील कार्यालय जवळ, आंबीगव्हाण फाटा व बोरद येथे, मोलगी पोलीस ठाणे हद्दीत- पोलीस ठाण्यासमोर व बैल बाजार येथे पाणपोई उभी करण्यात आलीय
शहर वाहतूक शाखे समोर असे एकुण-30 ठिकाणी नंदुरबार जिल्हा पोलीस दला मार्फत नंदुरबार जिल्ह्यात पाणपोई उभारण्यात आलेल्या आहेत.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने सुरु केलेल्या पाणपोईचे सर्वत्र कौतूक होत असून नागरिकांचा देखील या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने मागील वर्षी देखील जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना स्वच्छ व थंड पाणपोईची सोय उपलब्ध करुन दिली होती.
एकूणच पोलिसी वेशातील माणुसकीचं दर्शन नंदुरबार जिल्हावासीयांना कायम घडतंय ते नंदुरबारच्या एस पिं साहेबांच्या रूपातून .. अनेक शासकीय अधिकारी येतात आणि जातात ..
पण वेगळ्या कार्यकर्तृत्वानं ठसा उमटवणारे मोजके असतात त्यात पी आर पाटील यांचं नाव अग्रक्रमानं घ्यायला हवं ..
प्रविण चव्हाण, एम. डी. टी व्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here