नंदुरबार – आगामी सण – उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात मद्यपी वाहनचालकांवर कारवाईचा बडगा नंदुरबार पोलिसांनी उगारला आहे. यात मागील दोन दिवसात जिल्ह्यात ४४ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शणात जिल्हाभरात सुरु असलेल्या या कारवाईचे सर्वच स्तरातून स्वागत करण्यात येत आहे.
आगामी सण, उत्सवादरम्यान मद्यपान करुन वाहन चालविल्यामूळे होणारे अपघात व त्यातील मृतांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तसेच दारु पिवून वाहन चालविणारे किरकोळ कारणामुळे कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणतात. अशा इसमांविरुध्द् तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरोधात विशेष मोहिम राबवून कारवाई करण्याबाबत जिल्ह्या पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी जिल्हयातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने संपुर्ण नंदुरबार जिल्हयात दिनांक ९ व १० एप्रिल या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीत ठिक-ठिकाणी नाकाबंदी करुन दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांची तपासणी करण्यात आली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
नाकाबंदी दरम्यान एकुण ४० वाहन चालकांनी मद्यप्राशन केले असल्याचे आढळुन आले. त्यामुळे त्यांचे विरुध्द् नंदुरबार शहर पोलीस ठाणे – ०२, उपनगर पोलीस ठाणे – ०३, नवापूर पोलीस ठाणे – ११, विसरवाडी पोलीस ठाणे – ०४, शहादा पोलीस ठाणे – १०, धडगांव पोलीस ठाणे – ०२, म्हसावद पोलीस ठाणे – ०२, सारंगखेडा पोलीस ठाणे – ०२, अक्कलकुवा पोलीस ठाणे – ०२, तळोदा पोलीस ठाणे – ०२, मोलगी पोलीस ठाणे – ०१ असे एकुण ४४ गुन्हे दाखल करण्यात आले.
दरम्यान दारु पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुध्द् राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत मद्यपान करुन वाहन चालवितांना आढळून आलेल्या वाहन चालकांचे परवाने (लायसन्स) निलंबन करण्याचे प्रस्ताव उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदुरबार यांचे कार्यालयात पाठविण्यात येणार असुन लवकरच त्यांचेवर परवाने (लायसन्स) निलंबनाची कारवाई करण्यात येईल.पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, शहादा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत घुमरे, अक्कलकुवा विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाण्यांचे अधिकारी कर्मचारी यांनी वाहनधारकांवर कारवाई केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकादायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे. तसेच कोणीही मद्यपान करुन वाहन चालवू नये. मद्यपान करुन वाहन चालवितांना कोणी दुचाकीस्वार व चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर गुन्हे दाखल करुन परवाने (लायसन्स) निलंबित करणेची कारवाई सुरु राहील, असा इशारा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी दिला आहे.
प्रविण चव्हाण, जिल्हा प्रतिनिधी एम.डी.टी.व्ही.न्यूज नंदुरबार