नंदुरबार जि. प सभा : सत्ताधारी व विरोधक एकमेकांना भिडले ..

0
2460

नंदुरबार -११/६/२३

नुकतीच नंदुरबार जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा पार पडली
त्यात विविध विकासकामांचे बिले पेंडिंग ठेवल्याबद्दल विरोधकांनी सत्ताधारी यांना चांगलेच धारेवर धरले
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य एडवोकेट राम रघुवंशी यांनी यासंदर्भात सभेमध्ये प्रश्न उपस्थित केले
जिल्हा परिषदेमार्फत बऱ्याच दिवसांपासून विकास कामांची बिले निघावी या प्रमुख मागणीसह विविध प्रश्नांवर त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळालं
सदर सभा नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली

हे सुध्दा वाचा:

आक्षेपार्ह स्टेटस भोवले… नंदुरबारात एकावर कारवाई ! – MDTV NEWS

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

अवैद्य मद्य वाहतुकीवर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई.. – MDTV NEWS

वीस पंचवीस मिनिटे झालेल्या सभेत बांधकाम विभागाचे अधिकारी संजय कुमावत यांनी कामांमध्ये तक्रार प्राप्त झाल्याचे सांगताच यावर ऍडव्होकेट राम रघुवंशी यांनी सांगितले की कोणत्याही कामाची आपल्याकडे तक्रार असेल तर ती तक्रारीची प्रत सभा सुरू असताना सभागृहात दाखवावी अशी मागणी लावून धरली
विनाकारण विकास कामांचे बिल अडकून का ठेवतायेत असा आरोप त्यांनी यावेळी केला
यावेळी त्याचे स्पष्टीकरण म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर गावित यांनी कामांची चौकशी करून बिले अदा करण्यात यावी अशा सूचना संबंधित अधिकारी यांना दिल्या
यावेळी माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य एडवोकेट राम रघुशी यांच्यासह देवमन पवार विजय पराडके सी के पाडवी राया मावची यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

या संपूर्ण गदारोळात विरोधकांनी सभागृह दणाणून सोडला होता
यावेळी अजेंडा वरील विविध विषयांना मंजुरी देण्यात आली
यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक, कृषी सभापती गणेश पराडके, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित आदी उपस्थित होते…

हे सुध्दा वाचा:

आक्षेपार्ह स्टेटस भोवले… नंदुरबारात एकावर कारवाई ! – MDTV NEWS

BREAKING.. पुलकित सिंग यांची धडक कारवाई.. अक्कलकुव्यात दोन लाखाचे बियाणे जप्त.. – MDTV NEWS

अवैद्य मद्य वाहतुकीवर पिंपळनेर पोलीसांची धडक कारवाई.. – MDTV NEWS

नारायण ढोडरे, नंदुरबार ग्रामीण प्रतिनिधी ,नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here