नंदुरबार :- नंदुरबार तालुक्यासह जिल्ह्यातून शेती साहित्य चोरीच्या घटना काही दिवसापासून थांबलेल्या असताना मात्र कोरीट शिवारातील शेतातून चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीच्या ठिबक नळ्या चोरुन नेल्या आहेत. यामुळे या भुरट्या चोरट्याचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यानी केली आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार तालुक्यातील कोरीट शिवारात ब्रिजलाल भिक्कन चौधरी यांचे सर्व्हे क्र.२१६ मधील विहिरीजवळून अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किंमतीच्या ठिबकच्या नळ्या चोरुन नेल्या आहेत. ब्रिजलाल चौधरी यांच्या फिर्यादीवरुन उपनगर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ.कैलास मोरे करीत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.