नंदुरबार शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध ..

0
808

नंदुरबार -२१/४/२३

नंदुरबार येथील शेतकरी सहकारी संघाची निवडणूक बिनविरोध ४० वर्षांपासूनची स्व.बटेसिंगभैय्या रघुवंशी यांची परंपरा कायम ठेवली..
नंदुरबार शेतकरी सह.संघाची पंचवार्षिक निवडणूक सहकार विभागाकडून घेण्यात आली
बुधवार दि.१९/०४/२०२३ ह्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता.
शेवटच्या दिवशी धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख. शिवसेना नेते मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या गटातील(शिंदे गट) १३ पैकी १३ जागांवर उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले.
यावेळी विरोधी गटाकडून एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.
त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी सहा. उपनिबंधकांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे घोषित केले.
यावेळी शिवसेना कार्यकर्ते यांनी एकच जल्लोष केला…
शिवसेना नेते धुळे नंदुरबार जिल्हा संपर्क प्रमुख मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी बिनविरोध निवड झालेल्या संचालक मंडळाच्या नवनियुक्त संचालक बी.के.पाटील.,अरुण हजारे., प्रभाकर पाटील. ,लोटन पाटील., भारत राजपूत. ,पंडित पाटील. ,विलास पाटील,.संतोष पाटील,.गोकुळ नागरे.,उध्दव पाटील. नाथ्या वळवी,.सेजल पाटील,. मालतीबाई देसले यांचा सत्कार छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात केला ..

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा.

https://bit.ly/3UoK7E0

1 7
1
2 7
2


यावेळी मा.आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की शेतकरी सह.संघाची बिनविरोध निवड हि चांगल्या कार्याची पावती आहे
म्हणूनच यंदाही गेल्या ४०वर्षांपासून स्व.जि.टी.पाटील व माजी.आ.बटेसिंग भैय्या रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली मुहूर्तमेढ रोवली..
ती अशीच विकासाकडे घौडदौड करित शेतकरी सह.संघाची बिनविरोध निवड करत विरोधकांना कुठल्याही प्रकारची संधी न देता एकतर्फी संचालक मंडळ बिनविरोध निवड झाल्याचे सांगितले….
यावेळी मजुर फेडरेशनच्या नवनिर्वाचित संचालक मंडळ सुरेश इंद्रजित. ,अंकुश पाटील,.संतोष पाटील. ,रमेश भोई.,नथ्थु पाटील. ,किशोर गिरासे., देवराम गावित.,शशिकांत आगळे., दत्तु पाटील., हारसिंग पावरा. ,अनिता पुरुषोत्तम पाटील.,रेखा रवींद्र पाटील., मनिषा रमेश पाटील. यांचाही सत्कार करण्यात आला…
तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते विविध संस्था चे पदाधिकारी उपस्थित होते….।
नारायण ढोडरे,प्रतिनिधी :- ग्रामीण,एम डी टी व्ही न्यूज नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here