Nandurbar.. शेतकऱ्यांनो, खरीप हंगामासाठी पाणी अर्ज सादर करावेत…!

0
253

नंदुरबार : कार्यकारी अभियंता धुळे पाटबंधारे विभाग यांच्या अधिपत्याखालील नंदुरबार जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प, लघू प्रकल्प, बंधारे, अधिसूचित नदी-नाले तसेच तापी नदीवरील मंजूर उपसा सिंचन योजनांच्या पाण्याचा फायदा घेणाऱ्या बागायतदारांनी सुरू झालेल्या खरीप हंगाम २०२३ साठी ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पाणी अर्ज सादर करावेत, असे आवाहन धुळे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता एन.एम. व्हट्टे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

सर्व बागायतदारांनी आपले नमुना नं. ७, ७ (अ), ७ (ब) चे पाणी अर्ज संबंधीत शाखा कार्यालयात किंवा उपविभागीय कार्यालयात सादर करावेत. बागायतदारांना पाण्याच्या उपलब्धतेनुसार मंजूरी देण्यात येईल. बागायतदांरानी आपआपल्या शेतचाऱ्या स्वच्छ व सुस्थितीत ठेवाव्यात. मुदतीनंतर आलेल्या पाणी अर्जाच्या मंजुरीबाबत उपलब्ध पाणीसाठा व अगोदर आलेली मागणी विचारात घेवून नंतरच मंजूरी, ना मंजुरीचा विचार करण्यात येईल.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

मंजूरी व पाणी पुरवठ्याबाबत अन्नधान्ये, भुसार, व चारा पिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. पाण्याचा रितसर पास मिळाल्याशिवाय पाणी घेऊ नये. थकबाकीदारांनी मागील संपूर्ण थकबाकी दरसाल दर शेकडा १० टक्के जादा आकारासह भरणे आवश्यक आहे. पाणी नाश, पाळ्या नसताना पाणी घेणे, मंजुरीपेक्षा अधिक क्षेत्र भिजविणे, विहीरीवरील पिकास कालव्याचे पाणी घेणे, पाटमोट संबंध दूर न करणे आदी प्रकाराबाबत नियमानुसार पंचनामे करून दंडाच्या दराने आकारणी करण्यात येईल.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

टंचाई परिस्थितीत ऐन हंगामात पाणीसाठा पिण्यासाठी आरक्षित करावा लागल्यास पीक नुकसान भरपाई देता येणार नाही. पाणी अर्ज शाखा कार्यालय किंवा उपविभागीय कार्यालयास देऊन पोहोच पावती घेण्यात यावी. शासनाने काही सवलती दिल्यास त्याबाबत कळविण्यात येईल.

हे सुध्दा वाचा

Nandurbar News.. धूम स्टाईलने सोन्याची चैन पळणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या… १३ गुन्हे उघड | MDTV NEWS

धमनार परिसरात बिबट्याची दहशत.. गोऱ्हावर हल्ला करत केले ठार | MDTV NEWS

कजगाव बंद… सरपंचच उतरले रस्त्यावर; गावकऱ्यांचा रास्तारोको ! | MDTV NEWS

तळोदा, अक्कलकुव्यात मुसळधार .. शेतीसह अनेक घरांमध्ये शिरले पाणी | MDTV NEW

लाभक्षेत्रातील तसेच कालव्यापासून ३५ मीटर अंतराच्या हद्दीतील विहिरींबाबत नमुना ७ (ब) मागणी अर्ज न करता बिनअर्ज क्षेत्र भिजविण्यात आल्यास प्रचलित नियमानुसार पंचनामे करण्यात येतील. हस्तांतर झालेल्या पाणी वापर संस्थांना घनमापन पद्धतीने पाणी देण्यात येईल, असेही प्रसिध्दीपत्रकान्वये कळविण्यात आले आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here