नंदुरबार : पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांची बदली…

0
280

नंदुरबार :- जिल्हा पोलिस दलातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या झाल्या आहेत. तर चार अधिकारी नव्याने रुजू होणार आहेत. शुक्रवारी बदल्यांचे आदेश पारित झाले आहेत.

आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0

नंदुरबार येथून बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये पोलिस अधीक्षक यांचे वाचक अर्जुन पटले यांची नंदुरबार जात पडताळणी कार्यालयात तर एकनाथ पाटील यांची धुळे येथे जात पडताळणी कार्यालयात बदली झाली आहे. सारंगखेडा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांची ठाणे येथे बदली झाली आहे. तर जात पडताळणीचे निरीक्षक नितीन ठाकरे यांची मुंबई येथे बदली झाली आहे. राजेश शिंगटे यांची बुलढाणा, बाळासाहेब भापकर यांची छत्रपती संभाजीनगर ग्रामीण येथे बदली झाली आहे.

हे सुध्दा वाचा

Good News… राज्यातील सर्व आश्रमशाळांना मिळणार वॉशिंग मशिन | MDTV NEWS

ACB Trap … नंदुरबार पं.स.चे विस्तार अधिकरी जाळ्यात ! | MDTV NEWS

फोन पे, गुगल पे, पेटीएम वापरत असाल तर … – MDTV NEWS

म्हसावद पोलिसांनी रोखला पिप्राणी येथील बालविवाह ! | MDTV NE

नंदुरबारात येणाऱ्या पोलिस निरीक्षकांमध्ये अजय वसावे हे पालघर येथून येणार आहेत. राजेश जगताप हे धुळे येथून तर नीलेश गायकवाड हे नाशिक येथून नंदुरबारात येणार आहेत. लवकरच हे अधिकारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होतील, अशी माहिती मिळाली आहे.

एमडी.टीव्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here