नंदुरबार: बनावट मेसेज तयार करत ऑनलाईन पेमेंट केल्याचे भासवित सुवर्ण व्यावसायिकाची सुमारे ३९ हजारात फसवणूक केल्याप्रकरणी एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलीसांनी तपासाची चक्रे गतिमान करीत संशयितास ताब्यात घेतले आहे.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, नंदुरबार शहरातील गणेश जगदीश सोनार यांच्या मालकीच्या ज्वेलर्स दुकानात एका अज्ञाताने सोन्याची अंगठी खरेदी करावयाचे असल्याचे सांगितले. यावेळी त्याने ६ ग्रॅम ८० मिली वजनाची सोन्याची अंगठी खरेदी केली.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
सदर अंगठीचे बिल देण्यासाठी रोख रक्कम नसल्याचे त्याने गणेश सोनार यांना सांगितले.यामुळे श्री.सोनार यांनी त्यास ऑनलाईन पेमेंंट करण्यासाठी स्कॅनर दिले.मात्र, त्यात तांत्रिक अडचण येत असल्याचे संबंधिताकडून सांगण्यात आले.यामुळे त्यास श्री.सोनार यांनी पर्यायी खाते क्रमांक सांगितला.यादरम्यान, त्याने बनावट मेसेज तयार करुन रक्कम खात्यावर जमा झाल्याचे भासविले.
मात्र,बराच वेळ झाल्यानंतरदेखील पेमेंट जमा न झाल्याचे समजल्याने बँकेत खात्री करण्यात आली.मात्र,तेथूनही रक्कम जमा नसल्याचे समजल्याने गणेश सोनार यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी पोलीस ठाणे गाठले. यावेळी श्री.सोनार यांनी घडलेली घटना पोलीसांना सांगून सीसीटीव्हीतील चित्रीकरणदेखील पोलीसांना दिले.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
दरम्यान, शहर पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी तपासाची चक्रे गतिमान करत संशयितास ताब्यात घेतले.त्यास अटक केली असता त्याने त्याचे नाव देवल राजेंद्र शिंदे (रा.सरस्वती नगर, दिंडोरी, सुरत) असे सांगितले. पोलीसांनी १२ तासाच्या आत संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याने त्याचे नाव व पत्तादेखील खोटा दिला असल्याचे पोलीसांत नमूद फिर्यादीवरुन समजले आहे.
याप्रकरणी गणेश सोनार यांच्या फिर्यादीवरुन संशयित देवल शिंदे याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ४२०, माहिती तंत्रज्ञात कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर करत आहेत.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो नंदुरबार