नंदूरबार :- तालुक्यातील कोळदा येथील सामान्य शेतकरी कुटुंबातील प्रशांत गजानन राजपुत याने नुकताच लागलेल्या यूपीएससीच्या निकालात घवघवीत यश मिळविले आहे. प्रशांत हा देशात ९७ वा रँकने उत्तीर्ण झाला आहे. त्यामुळे त्याचे जिल्हाधिकारी बनण्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. आज प्रशांतवर शुभेच्छांचा वर्षाव सुरु आहे. तर प्रशांतच्या शेतकरी आई – बापाची मान अभिमानाने उंचावली आहे.
नंदूरबार तालुक्यातील कोळदा येथील शेतकरी गजानन राजपुत हे आपल्याकडील असलेल्या शेतीत राबून व सोबत दुधाचा व्यवसाय करीत आपल्या कुटूंबाचा गाडा चालविण्याबरोबर मुलांचे शिक्षण पूर्ण करीत होते. आपली मुले मोठी व्हावीत, अधिकारी व्हावेत असे स्वप्न त्यांनी नेहमी बघतले. त्यांचा मुलगा प्रशांत राजपुत याने आज वडिलांचे स्वॅप साकारत मोठे यश मिळविले आहे.
आता WhatsApp वर मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि महत्वपूर्ण माहिती! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन करा. https://bit.ly/3UoK7E0
प्रशांत यांचे प्राथमिक शिक्षण कोळदा गावातच झाले. त्यानंतर त्यांनी नंदूरबार येथील एकलव्य विद्यालयात १२ पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. अभ्यासात सातत्य ठेवत चिकाटीने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. दिवसरात्र १० ते १२ तास अभ्यास केला. यामुळे त्यांना नुकताच लागलेल्या यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळाले आहे. त्यांनी देशात ९७ वा रँक मिळविला आहे.
प्रशांत यांच्या या यशामुळे एका खेडेगावातील सामान्य कुटुंबातील मुलाचे जिल्हाधिकाऱ्याचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. निकालाची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र परिवाराने शुभेच्छा देण्यासाठी प्रशांत राजपूत यांच्या घरी एकच गर्दी केली होती. सकाळपासून प्रशांत यांच्यावर शुभेंच्छांचा वर्षाव सुरु आहे.
एम.डी.टी.व्ही. न्युज ब्युरो, नंदुरबार.